nanded
nanded  sakal
नांदेड

नांदेडमध्ये नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे दोन तालुक्यासह सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा पाऊस इतर भागातील चांगला झाला. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले आहेत. त्याचबरोबर विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्याने सोमवारी (ता. ३१) दुपारी तीन वाजेपर्यंत तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

त्यातून एक हजार ४०१ क्युमेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊसही झाला. दरम्यान, सोमवारी दुपारी चारनंतर जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला.

हा पाऊस लोहा, देगलूर, मुखेड, कंधार, हिमायतनगर, धर्माबाद, माहूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या सोबत इतरही मंडळात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन पिकाला दिलासा मिळाला आहे. यासोबतच कपाशी, तूर, ज्वारी या पिकांनाही या पावसाचा फायदा झाला आहे.

लोहा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या तालुक्‍यात सरासरी ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर देगलूर तालुक्यात सरासरी ६५.४० मिलिमीटर पाऊस झाला. तर माळाकोळी - १३७.५८, चांडोळा - १२७.३०, कुरुळा - ८२, मुखेड - ९७.८०, जांब - ६६.८९ या पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

दोन जण वाहून गेले

दरम्यान, उंद्री (पदे) (ता. मुखेड) येथील एक १५ वर्षाचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला तर दुसरीकडे कोष्ठवाडी (ता. लोहा) येथील ३२ वर्षाचा व्यक्ती जनावरे चरायला घेऊन शेतात गेला होता. तो सोमवारी सायंकाळी घरी येत असताना पुरात वाहून गेला आहे.

२४ तासात झालेला तालुकानिहाय पाऊस

नांदेड २०.२०, बिलोली ४२.६०, मुखेड ६२.२०, कंधार ५७.७०, लोहा ६९ हदगाव दहा १०.२०, भोकर २९.५०, देगलूर ६५.४०, किनवट १९.३० मुदखेड १४.१०, हिमायतनगर ३२.९०, माहूर २४, धर्माबाद ४७.५०, उमरी १४, अर्धापूर २१.७० तर नायगाव ३९.२०. सरासरी ३७.२० तर आजपर्यंत जिल्ह्यात ६४७ मिलिमीटर नुसार ८८.६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT