Nanded News 
नांदेड

बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसेसना शिस्त लावणार कोण;पोलिस, सुरक्षा रक्षकांची बघ्यांची भूमिका

शिवचरण वावळे

नांदेड - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या ना त्या गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत राहते. सध्या बसस्थानकात दोन पोलिस कर्मचारी आणि दोन सुरक्षारक्षक असताना देखील बस चालकांमधे फलटावर एसटी बस लावण्यासाठी नेहमीच बाचाबाची होत असल्याने इथे शिस्त लावणार कोण हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
नांदेड बस्थानकात मराठवाड्यासहीत विदर्भ आणि तेलंगणा राज्यातील बसेस मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करतात. परंतु वेळे अगोदर बसस्थानकात आलेल्या गाड्यांना योग्य ठिकाणी पार्किंग लावणे, योग्य वेळी गाड्यांना फलाटावर लावणे, फलाटावर लागलेल्या बसेस ठरलेल्या वेळात बसस्थानकातुन बाहेर काढणे हे तेथील सुरक्षा रक्षकाचे कर्तव्य आहे. मात्र बसस्थानकातील पोलिस चौकीत दोन पोलिस कर्मचारी व दोन सुरक्षारक्षक तैनात असताना देखील दोन बसचालकांमध्ये बस लावण्याच्या व बसला धक्का लागण्यावरुन वाद होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 

बसस्थानकात एकही अधिकारी उपस्थित नव्हते

शनिवारी (ता.सहा) दुपारच्या वेळी तेलंगणा राज्यातील बस चालकांना अतिशय कमी जागेतुन बस लावणे व बस काढण्यासाठी घाई करण्याच्या नादात एका बसला धक्का लागल्याने चालकाचा राग अनावर झाला. यातून दोन बस चालकामध्ये चांगलीच वादावादी सुरु झाली. बस चालकांमध्ये वाद रंगल्यानंतर काही वेळासाठी अनेक बसेस बसस्थानकात बाहेर पडणे व लावण्याचा खोळंबा झाला होता. 
शनिवार असल्याने बसस्थानकात एकही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे दोन बसचालकांचा वाद सोडणार कोण हा प्रश्‍न पडला होता. शेवटी काही प्रवाशी व बसचालक - वाहकांनी मध्यस्ती केल्याने हा वाद निवळला आणि फलकावरुन बस बाहेर काढण्याची विनंती केल्याने तेलंगणा राज्यातील बस मार्गस्त झाली. 

पोलिस म्हणतात हे तर रोजचेच भांडण 

बस स्थानाकात दोन पोलिस, मास्को कंपनीचे दोन सुरक्षा रक्षक तैनात असताना बस लावण्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळे बस चालकांमध्ये बस लावण्याच्या कारणावरुन नेहमीच खटके उडतात. इतकेच नव्हे तर वादाचे रुपांतर हाणामारी पर्यंत जाते. शनिवारी देखील असाच प्रकार घडला, परंतु उपस्थितीत पोलिस व सुरक्षा रक्षक यांनी हे तर रोजचेच भांडण आहे. म्हणत बघ्याची भूमिका घेतली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Eating Bread Daily: दररोज ब्रेड खाल्लं तर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT