नवरात्र

Navratri Festival 2019 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गंगाष्टक रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गंगाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. उत्सवकाळात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने चोख व्यवस्था ठेवली आहे.

मंदिरात दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, काल पहिल्याच दिवशी दिवसभरात पासष्ट हजाराहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. 

आजच्या पूजेविषयी... 
जेंव्हा आदि शंकराचार्य काशीमध्ये होते. त्या वास्तव्यकाळात गंगाष्टक त्यांनी लिहिले असावे. गंगा नदीचे भारताच्या धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. गंगेच्या मूर्तीमध्ये तिच्या हातात अखंड जीवनप्रवाहाचे, अमृताचे प्रतिक म्हणून मंगल कलश असतो आणि ज्ञानाचे- पवित्रतेचे प्रतिक म्हणून कमळ असते. हे जुन्ह्यु ऋषींच्या कन्ये, हे जान्हवी गंगे, हे भीमजननी गंगे, तू पतितांचा, पापीजनांचा उध्दार करणारी आहेस. तू हिमालयातील पर्वतांमधून खळाळत वाहतेस आणि त्यांना शोभा आणतेस. तू सर्व प्रकारच्या पातकांचा नाश करणारी आणि तीन्ही लोकांमध्ये पवित्र आहेस, असे महात्म्य गंगाष्टकात सांगितले असल्याचे श्रीपूजक रामप्रसाद ठाणेकर, योगेश जोशी, श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, माळशिरसमधून मोहिते पाटील गटाने खाते उघडले; अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

Sanjay Raut Delimitation : डिलिमिटेशन हा जनतेच्या हातातून सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजपने रचलेला कट; संजय राऊत यांचा घणाघात

Supreme Court: शिक्षकांसाठी मोठी बातमी! पात्रता असूनही बिनमंजूर पदावर नोकरीचा हक्क नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?

Latest Marathi News Live Update : बोपदेव घाट दुर्घटनेनंतर केजे शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू

Chhatrapati Sambhajinagar: शास्त्रीय गायक नेवपूरकरविरोधात पोक्सोचा गुन्हा; संगीत शिकवताना शारीरिक संबंधाची मागणी केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

SCROLL FOR NEXT