Navratri 2022
Navratri 2022 esakal
नवरात्र

Shardiya Navratri 2022 : या मंत्राने करा नवदुर्गा देवीची उपासना; पापांचा होईल नाश, नियम जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा देवीची भक्तांकडून मोठ्या भक्तीभावाने पुजा केली जाते. याकाळात कुमारिका पुजन, सप्तशती पाठाचे पारायण यासह यज्ञ-यागादी कर्म केले जातात. आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी भाविक जागरण गोंधळाचेही आयोजन करतात. देवीची सदैव कृपा असावी यासह पापांचा नाश व्हावा यासाठी शास्त्रात देवी अथर्वशीर्ष पारायणालाही विशेष महत्व आहे. कशाप्रकारे करावे देवी अथर्वशीर्ष पारायण अन् त्याचे महत्व यासाठी हा लेख पुर्ण वाचा.

(Shardiya Navratri Ghatasthapana 2022 Navdurga puja spiritual significance importance of Devi Atharvshirsh)

देवीच्या प्रसन्नतेसाठी हा पाठ करावा

दुर्गादेवीची सदैव कृपा अन् आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी देवी अथर्वशीर्ष पारायण महत्वपुर्ण मानले जाते. अथर्ववेदात देवी अथर्वशीर्षाची महिमा सांगितली गेली आहे. सप्तशती पाठाचा एक अंग म्हणजेच देवी अथर्वशीर्ष. सप्तशती ग्रंथाव्यतिरिक्त याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. सप्तशती पाठाच्या पारायणाचा आरंभ करण्यापुर्वी देवी अथर्वशीर्ष पाठ केला जातो. यासह आपण आपल्या मनोभावेसुद्धा देवीच्या प्रसन्नतेसाठी हा पाठ करु शकतो.

navratri festival

देवी अथर्वशीर्ष पाठ केल्याने हे लाभ होतात.

* देवी अथर्वशीर्षाचे अथर्ववेदात महत्व सांगितले आहे.

* भय, पिडा, दुःख- रोग, पापांचा नाश करण्यासाठी अथर्वशीर्ष पाठ करावा.

* हा पाठ केल्याने महादुर्गा प्रसन्न होऊन भक्तांचे संकटातून रक्षण करते.

* यासह मनोवांचित मनोकामना पुर्ण व्हाव्या यासाठी देवी अथर्वशीर्ष पाठ जरूर करावा.

* सायंकाळी हा पाठ केल्याने देवीच्या कृपेने पापांचा नाश होतो.

Navratri 2022

पाठ करताना या नियमांचे जरुर पालन करावे

1) देवी अथर्वशीर्ष पाठ करताना त्याचे संपुर्ण ज्ञान आपण आपल्या गुरुजनांकडून अवगत करुन घ्यावे. अज्ञानवश पाठ केल्यास त्याचे फळ प्राप्त होणार नाही.

2) संपुर्णपणे शुचिर्भुत होवून एकाग्र चित्ताने पाठाचे पारायण करावे.

3) प्रत्येक स्तोत्राचे वाचन हे मानसिक (मनातल्या मनात) न करता वाचिक (स्पष्ट उच्चारांनी) करावे.

4) मोठ- मोठ्याने ओरडून व उतावळेपणाने पाठ वाचू नये.

5) आपल्याला देवी अथर्वशीर्षातील श्लोक मुखोद्गत (तोंडपाठ) नसतील तर पुस्तकात पाहून पारायण करावे मात्र श्लोकांचे चुकीचे उच्चारण करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT