167 applications for sahyadri sugar factory.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सह्याद्री कारखान्यासाठी १६७ उमेदवारांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा

सह्याद्री कारखान्यासाठी १६७ उमेदवारांचे अर्ज

कऱ्हाडः यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या  शेवटच्या दिवसअखेर १६७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. 

दहा मतदारसंघांतून २१  सदस्यांयाठी निवडणूक होत आहे. कोपर्डे हवेली गटातून सर्वाधिक २६, तर त्यापाठोपाठ मसूर गटातून २५ तर उंब्रज गटातून २४ अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या एका जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता. १३) दाखल अर्जांची छाननी होणार आहे. ता. १४ ते २८ जानेवारीअखेर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

सह्याद्री कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सोमवारपासून (ता. ६) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह काल २१ जणांचे २२ अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोहर माळी काम पाहात आहेत. येथील नवीन प्रशासकीय इमारतीत निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू आहे. अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस असल्याने कार्यालय सकाळपासूनच इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी गजबजले होते.

निवडणुकीसाठी कऱ्हाड, तळबीड, मसूर व वाठार किरोली गटातून प्रत्येकी तीन तर उंब्रज, कोपर्डे हवेली व महिला राखीव गटातून प्रत्येकी दोन सदस्यांना निवडून द्यायचे आहे. तसेच अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग या मतदारसंघासाठी प्रत्येकी एक यानुसार २१ सदस्यासांठी ही निवडणूक होत आहे.

आज (ता. १०) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत कऱ्हाड गटातून १५, तळबीड गटातून २५, उंब्रज गटातून २४, कोपर्डे हवेली गटातून २६, मसूर गटातून २५, वाठार गटातून २८, महिला राखीव मतदारासंघातून सहा, विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून तीन तर इतर मागास प्रवर्गातून पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यलयात दाखल अर्जांची छाननी होईल. १४ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत राहील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT