17-year-old girl raped 
पश्चिम महाराष्ट्र

तिला कळा लागल्याने घरी कळलं... अन पुढे झाला हा घोळ

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : तालुक्‍यातील एका गावातील शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर तरुणाने दोन महिन्यांपूर्वी बलात्कार केला. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला काल (मंगळवारी) रात्री अटक केली. ज्ञानेश्वर ऊर्फ छोट्या भाऊसाहेब बाचकर (वय 19) असे त्याचे नाव आहे. 

आरोपी बाचकर सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करतो. शेतात काम असल्याचे सांगून दोन महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तो घेऊन गेला. शेतातील एका शेडमध्ये पीडितेचे हात बांधून, तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने, आईने तिला बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडिता दोन महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. याबाबत आई-वडिलांनी विचारणा केल्यावर, सगळा प्रकार समोर आला. आई-वडिलांनी तिला नगर येथे जिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी "चाइल्ड लाइन' संस्थेला कळविले. संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित मुलीला मानसिक आधार देत, पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार काल (मंगळवारी) राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT