Accident Near Kanangale Two youth from Kolhapur Dead
Accident Near Kanangale Two youth from Kolhapur Dead 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अपघातामध्ये कोल्हापूरचे दोन युवक ठार; आठ जखमी

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (बेळगाव) - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगले येथे मोटार अपघातामध्ये दोन युवक ठार झाले तर अन्य आठजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास झाला. चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळली व नंतर ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर लटकत राहीली. 

दिग्विजय सचिन पाटील (२०, रा. संभाजीनगर, कोल्हापूर) व वैभव सुभाष वाडकर (२३, रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. अन्य जखमी हे संभाजीनगर, बाचणी व मुरगूड येथील आहेत. संकेश्वर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.

अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मोटारीने (एमएच १० जीए ९३५१) दहा जण कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने निघाले होते. कणगल्यानजीक आल्यावर चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार महामार्गाच्या दुभाजकावर जोरात आदळले. त्यात मोटारीमधील दहा जण जखमी झाले. त्यांना निपाणीच्या महात्मा गांधी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गंभीर असलेल्या दिग्विजय पाटील व वैभव वाडकर यांचा मृत्यू झाला.

या अपघातात तेजस सचिन पाटील, संदीप जयसिंग पाटील, वेदिका सागर पाटील, वीरेन सागर पाटील (रा. सर्व संभाजीनगर-कोल्हापूर), अभिनव संदीप पाटील, अर्नव संदीप पाटील, सागर दत्तात्रय पाटील (रा. सर्व बाचणी, ता. कागल), सूरज सुनील पाटील (रा. मुरगूड, ता. कागल) हे जखमी झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT