Udayanraje-Bhosale-and-Shrinivas-Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : उदयनराजेंना आव्हान देणारे श्रीनिवास पाटील आहेत कोण?

आशिष नारायण कदम

सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड स्पर्धक निवडणुकीच्या आखाड्यात उतरविला आहे.

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे आता उदयनराजेंना टक्कर देणार आहेत. पाटील यांचे नाव निश्चित होण्याअगोदर पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने, नितीन पाटील यांच्या नावांची चर्चा होती. खुद्द शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना पसंती दर्शविली होती. मात्र, सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाबाबत असलेली नाराजी लक्षात घेत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

सातारा जिल्ह्यातीलच पाटण तालुक्यातील मारुल हवेली हे श्रीनिवास पाटील यांचं मूळ गाव. 11 फेब्रुवारी 1941 साली शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाटील हे लहानपणापासूनच लहान-मोठ्या माणसांत मिसळत होते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास पाटील यांना लाभला. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर पाटील यांना यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ यांचे मार्गदर्शन मिळाले आणि पुढे जिल्हाधिकारी म्हणून निवडले गेले.

दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात पवार यांनी पाटील यांना कराड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. पहिल्यापासूनच कराड हा चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमिला चव्हाण यांनीही या मतदारसंघातून विजयी निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीराज यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांचा निभाव लागेल का? अशी त्यावेळची परिस्थिती होती. मात्र, जिल्हाधिकारी झाल्यानंतरचा अनुभव आणि लहानपणापासून लोकांमध्ये सहज मिसळण्याची खुबी पाटील यांच्याकडे असल्याने रांगड्या भाषणांद्वारे त्यांनी लोकांना आपलेसे केले. याच्या जोरावरच त्यांनी लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आणि ते खासदार झाले. 

श्रीनिवास पाटील यांची बलस्थाने

साधी राहणी, रांगड्या बोलीतील भाषणे, गावोगावच्या जत्रा आणि कुस्तीची मैदाने आणि पंगतीला बसून कार्यकर्त्यांच्या पत्रावळीमध्ये जेवण करण्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील व्यक्ती असल्यासारखे वाटत. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात पाटील यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

एकीकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले उदयनराजे भाजपतर्फे पोटनिवडणुकीच्या मैदानात आहेत. तर दुसरीकडे भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले, त्यानंतर राज्यपाल पद भूषविलेले, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले आणि महत्त्वाचे म्हणजे सातारच्या मातीत जन्मलेले श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत.  

दोघांमध्ये थेट लढत

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 4 ऑक्टोबरला अर्ज भरल्यानंतर 5 ऑक्टोबरला त्या अर्जांची छाननी करण्यात आली. 7 ऑक्टोबरला अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यावेळी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर आपला अर्ज माघारी घेतला आहे. लोकसभेवेळी उदयनराजेंच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांनी अगोदरच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता उदयनराजे भोसले (भाजप) आणि श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यातच थेट लढत रंगणार आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT