Babasaheb Ambedkar Welcome Arch Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : डॉ. आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडणारी बेडग ग्रामपंचायत बरखास्त करा; बौद्ध समाज आक्रमक

'तत्कालीन गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करून चौकशी करा'

सकाळ डिजिटल टीम

स्वागत कमान बांधण्याच्या प्रस्तावाची तपासणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, अशी माहिती धोडमिसे यांनी दिली.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याप्रकरणी ग्रामपंचायत बरखास्त करा, तत्कालीन गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा १ सप्टेंबरपासून सांगलीत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची बौद्ध समाजबाधवांनी जिल्हा परिषदेत भेट घेतली. डॉ. महेशकुमार कांबळे, सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, ढवळीचे उपसरपंच स्वप्नील बनसोडे, एरंडोलीच्या सरपंच वासंती धेंडे, अरविंद कुरणे, रणजित कांबळे, अमर कांबळे, शिवाजी कांबळे, जयंत मगरे उपस्थित होते. त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

सरपंचासह सदस्यांनी बेकायदेशीरपणे स्वागत कमान पाडली. ग्रामपंचायत बरखास्त करा. तत्कालीन गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करून चौकशी करा. १५ ऑगस्ट २००८ च्या ग्रामसभेचा ठराव मान्य करून स्वागत कमान बांधण्याचा प्रस्ताव ‘जिल्हा नियोजन’कडे तत्काळ सादर करा, अशी मागणी आहे.

दोषी अधिकारी, ग्रामसेवकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. स्वागत कमान बांधण्याच्या प्रस्तावाची तपासणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, अशी माहिती धोडमिसे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT