Bear attack on farmer in belgaum
Bear attack on farmer in belgaum  
पश्चिम महाराष्ट्र

सरपण आणण्यासाठी गेले आणि दोन अस्वलांनी त्यांच्यावर... 

सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : घराच्या मागे सरपण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दोन अस्वलांनी हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता. 20) दुपारी आमगावात (ता. खानापूर) घडली. लक्ष्मण सहदेव घाडी (वय 68, रा. आमगाव) असे जखमीचे नाव असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लक्ष्मण घाडी दुपारी घरापासून हाकेच्या अंतरावर सरपण आणण्यासाठी गेले होते. यावेळी मागून आलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोक्याला ओरबाडल्यामुळे नखे आत घुसून ते गंभीर जखमी झाले आहेत. हाताला आणि जांघेला जबर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वलांनी जंगलात पळ काढला. त्यांचा आवाज ऐकून गावकरीही घटनास्थळी धावले. या घटनेची माहिती भीमगड अभयारण्य वनाधिकाऱ्यांना दिली. काही वेळातच कणकुंबी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी घाडी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा वनाधिकारी एम. बी. अमरनाथ यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. उपचाराचा खर्च वनखात्याकडून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून गावाजवळ अस्वलांचा वावर वाढला आहे. लक्ष्मण घाडी यांच्यावर यापूर्वीही दोनवेळा अस्वलांनी हल्ला केला होता. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले होते. दुसऱ्या हल्ल्यात त्यांच्या डोकीला जखम झाली होती. त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT