bjp leader chandrakant patil press conference kolhapur Vidhan Sabha maharashtra 
पश्चिम महाराष्ट्र

मंडलिक प्रवृत्तीचा शिवसेनेने विचार करावा : चंद्रकांत पाटील 

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर आज, पहिल्यांदाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थेट पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापुरात असून, त्यांनी तेथे दुपारी पत्रकार परिषद घेतली. 

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कमी झालेल्या जागांबाबत विश्लेषण मांडले. त्यावेळी भाजपचा पराभव झालेला नाही. पक्षाने सलग दोनवेळा 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत, ज्या ठिकाणी पराभव झाला तेथे भाजपच्या बंडखोरांमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी जनतेलाच विचारलं, आमचं काय चुकलं
आदित्य ठाकरे यांच्यासोबत समन्वयाने काम करणार : रोहित पवार

खासदार मंडलिकांची भूमिका जिव्हारी 
शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी  जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'खासदार संजय मंडलिक यांनी कायम सोयीस्कर भूमिका घेतली आहे. कागल नगरपालिकेत त्यांचे दोन नगरसेवक आले. मुश्रीफांचे आठ आले. भाजपचे नऊ आले. पण, त्यांनी मुश्रीफांसोबत सत्ता स्थापन केली. जिल्हा बँकेतही एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळं पाडा पाडीचं राजकारण करणाऱ्यांच्या जीवावर शिवसेना चालवणार का?' मुळात कोल्हापूरचा हा निकाल आमच्यासाठी अनाकलनीय आहे. त्यामुळं याची कारणं आम्ही तपासून घेणार आहोत. शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी उघडपणे ऋतुराज पाटील यांच्यासाठी काम केलं. सोयीचं राजकारण करणारी मंडलिक ही एक प्रवृत्ती आहे. त्याचा शिवसेनेने आता विचार करायला हवा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

उन्माद म्हणजे, उदयनराजे; शिवसेनेने काढले चिमटे

काय होती खासदार मंडलिकांची भूमिका?
लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांचे चुलत भाऊ धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. अमल महाडिक यांनी त्यावेळी युती धर्म पाळला नाही. त्यांनी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला. त्यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी उघडपणे मंडलिक यांना मदत केली होती. त्यामुळे प्रा. मंडलिक यांचा विजय सुकर झाला. आता विधानसभा निवडणुकीत मंडलिक यांनी महाडिक यांच्या विरोधात काम करून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना मदत केली. असे करत मंडलिक यांनी महाडिक यांना शह दिला आणि लोकसभेतील मदतीची परतफेड केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT