पश्चिम महाराष्ट्र

अरेरे...बालिका बादलीत बुडाली

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सोनगाव (ता. सातारा) येथे खेळता- खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने वीटभट्टी कामगाराच्या तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. चिनू यल्लाप्पा दोडमणी (वय 3, रा. ओवीअळी, ता. मुद्याहाळ. जि. विजापूर) असे मृत बालिकेचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनूचे वडील यल्लापा दोडमणी हे वीटभट्टी कामगार आहेत. दर वर्षी ते पत्नीसबोत वीटभट्टीवर काम करण्यासाठी सोनगाव येथे येतात. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे महिनाभरापूर्वीच ते कुटुंबीयासोबत सोनगाव येथे आले होते. त्यांच्यासोबत चिनूही होती. यल्लापा हे घरात जेवण करत होते. त्या वेळी पत्नी यल्लामा या झोपडीसमोर कपडे धूत होत्या. कपडे धूऊन झाल्यानंतर त्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेल्या. त्या वेळी त्यांच्याकडून बादलीमध्ये पाणी तसेच राहिले होते.

खेळत- खेळत चिनू ही बादलीजवळ आली. बादलीतील पाण्यात हात घालून ती खेळत असताना तोल जाऊन ती बादलीत पडली. तोंड खाली आणि पाय वर अशा अवस्थेत ती होती. प्रयत्न करूनही तिला बादलीतून सरळ होता आले नाही. बराच वेळ ती तशाच अवस्थेत बादलीत होती. ही बाब कोणाच्याही निदर्शनास आला नाही. काही वेळाने जेवण करून यल्लापा हे झोपडीतून बाहेर आले. त्या वेळी चिनूचे पाय बादलीतून वर दिसले. त्यांनी तिला बाहेर काढले; परंतु ती बेशुद्ध पडली होती. त्यांनी तिला मोटारसायकलवरून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - Video : उदयनराजे सध्या काय करतात...

नक्की वाचा - मंत्री,खासदारांच्या मागे-पुढे करत ते लाटत असत लाखाे रुपये
 

जरुर वाचा - ...म्हणून महाबळेश्‍वरातूनच मुख्यमंत्र्यांनी फिरवली सूत्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

'इच्छाधारी नागीण'ची मुख्य अभिनेत्री बदलली! नक्की कारण काय? झी मराठीने दिला प्रेक्षकांना धक्का; नवा प्रोमो Viral

Latest Marathi News Update : बिहारमध्ये आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच दोन अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; विधान परिषदेत विरोधकांना मोठा धक्का

Pargav Water Crisis News : आंबेगावच्या पूर्वभागात घोडनदीकाठी गंभीर जलसंकट; डिंभे धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडे तीव्र मागणी

Recharge Plan: स्वस्त रिचार्ज प्लान फक्त १७९ रुपयांपासून सुरू! वर्षभर कॉलिंगची सुविधा...पाहा आणखी काय मिळणार?

SCROLL FOR NEXT