The corona does not grow in the heat 
पश्चिम महाराष्ट्र

...त्यामुळे बेळगावात कोरोना वाढणार नाही 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - विदेश दौऱ्यावरुन आलेल्या 14 जणांवर सध्या जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने नजर ठेवली आहे. बेळगावातील तापमानवाढीमुळे कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. तरीही पूर्वखबरदारी म्हणून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला आहे. 

विविध कारणांमुळे विदेशात राहिलेले 14 लोक बेळगावात परतले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यामध्ये कोणतेही विषाणू आढळून आलेले नाहीत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य खाते सध्या त्यांच्यावर नजर ठेवून आहे. देशभरात ज्याठिकाणी कोरोनाबाधित आढळून आले आहेत, त्या ठिकाणाहून बेळगावात येणाऱ्या पर्यटक आणि लोकांचीही माहिती घेतली जात आहे. गुरुवारी (ता. 12) केरळमधून आलेल्या होसूर येथील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने जिल्हा रुग्णालयातील कोरोनाच्या स्वतंत्र विभागात त्याला ठेवण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही यासंबंधी माहिती घेतली जात असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रालाही याची कल्पना देण्यात आली आहे. गुलबर्गा येथे सौदीहून परतलेल्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील कोरोनाचा तो पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांबाबत अधिकच दक्षता घेतली जात आहे. 

उष्ण हवामान फायदेशीर 
कोरोनाचे विषाणू हे थंड हवेमध्ये अधिक वाढतात. तर उष्ण हवामानात ते टिकत नाहीत. कोरोनाच्या विषाणूंना उष्ण हवा मानवत नाही. त्यामुळे 30 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात ते अधिक वाढतात. तर त्याहून अधिक तापमान असल्यास ते वाढत नाहीत. सध्या बेळगावचे कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सियस आहे. पुढील आठवडाभरात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून बेळगावचे तापमान 36 ते 37 अंश सेल्सियसपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाचा बेळगावात अधिक प्रसार होण्याची शक्‍यताही कमी असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. 

""विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी आरोग्य खाते जागरुक आहे. विदेशातून आलेल्या 14 लोकांवर लक्ष ठेवून आहोत. सध्या हवामान खात्याकडूनही हवामानाचा अंदाज घेण्यात आला आहे. तापमान वाढणार असल्याने कोरोनाचे विषाणू त्यात टिकणार नाहीत. तरीही सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी सध्या आईस्क्रीम, कोल्ड्रिंक अशा थंड वस्तू टाळाव्यात.'' 
-एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा आरोग्याधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT