Corona virus arrives in Bangalore marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे ! कोरोना पोचला बंगळुरात....

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या हैदराबादच्या रहिवाशाला कोरोना व्हायरसची (सीओव्हीआयडी-१९) लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे, ही व्यक्‍ती वास्तव्यास असलेल्या भागातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या दक्षता विभागाने सर्जापूर रोडवरील अपार्टमेंट व्यवस्थापनाला नोटीस बजावली. या घटनेमुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्वांनाच सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 युवक कोरोना चाचणीत पॉझीटिव्ह आढळला

शहराच्या पूर्वेकडील सर्जापूर रोडवरील अपार्टमेंटमध्ये हैदराबादचा एक सॉफ्टवेअर कर्मचारी आपल्या गावी जाण्यापूर्वी एक-दोन दिवस थांबला होता. तो नुकताच दुबईहून परतला होता. कोरोना चाचणीत तो पॉझीटिव्ह आढळला होता. तरीसुद्धा तो २० फेब्रुवारीला बंगळूरच्या आपल्या कार्यालयात पुन्हा कामावर हजर झाला होता. हाँगकाँगमधील सहकाऱ्यांसोबत काम करत असताना त्याला दुबईत कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. २२ फेब्रुवारीला तो हैदराबादला रवाना झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अपार्टमेंटला भेट देऊन थोडेसे जरी लक्षण आढळल्यास सार्वजनिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला रहिवाशांना दिला आहे.

राज्यात हाय अलर्ट

तसेच अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. १० मध्ये वास्तव्यास असणाऱ्या व्यक्तीला ‘सीओव्हीआयडी-१९ पॉझिटिव्ह’ असल्याची माहिती आहे. त्यासाठी अपार्टमेंटमध्ये खबरदारी घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.आम्ही या भागावर लक्ष ठेवून काम करत आहोत. आतापर्यंत परिसरातील ९० घरे तपासली आहेत आणि ४० घरांना भेट दिली आहे. प्रत्येक घरात आम्ही शिंकणे, घसा खवखवणे किंवा शरीर दुखणे यासारखी लक्षणे शोधत आहोत. अशी लक्षणे आढळल्यास आम्ही त्यांना रुग्णालयात पाठवून पुढील २८ दिवस ‘होम क्वारंटाईन’मध्ये राहाण्याचा सल्ला देत आहे, असे बंगळूर शहराचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT