dead trusties three acres of land occupied in belwandi 
पश्चिम महाराष्ट्र

...नि मृत विश्‍वस्त जिवंत झाली 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : मृत विश्‍वस्ताच्या नावावरील तीन एकर जमीन काही जणांनी संगनमताने हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालिन नायब तहसीलदार, दुय्यम निबंधक, महसूल कर्मचाऱ्यांसह 24 जणांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी कटकारस्थान व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथे हा प्रकार समोर आला आहे. "अंजनाबाई भिकाजी ढमढेरे' असे या ट्रस्टचे नाव आहे. ट्रस्टच्या मालकीची बेलवंडी येथे तीन एकर नऊ गुंठे जमीन आहे. मृत विश्‍वस्त जिवंत असल्याचे दाखवून परस्पर कटकारस्थान रचून जमिनीची विक्री करण्यात आली होती. हा सगळा प्रकार चार वर्षांपुर्वीचा असून, त्याबाबत मंगळवारी (ता.4) रात्री फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. 

बनावट दस्ताऐवज बनविला

याबाबत ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानूसार दाखल गुन्ह्यातील हकीकत ही 30 नोव्हेंबर 2015 ते 17 जून 2016 दरम्यानची आहे. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टी मृत असल्याचे माहिती असतानाही त्यांच्या जागी खोटी व्यक्ती उभी करून बनावट दस्ताऐवज तयार केला. बनावट ओळखपत्र, बोगस सह्या व अंगठ्याच्या आधारे ट्रस्टची जमीन बळकाविली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलत जाधव करीत आहेत. 

आरोपींची नावे 

गौतमचंद पुनमचंद बाठिया (माणिकनगर, स्टेशनरोड, नगर), सुभाष अर्जुन पवार (बेलवंडी), तत्कालिन नायब तहसीलदार (नाव समजले नाही), महेश खेतमाळीस व विजय मोरे (दोघेही रा. श्रीगोंदे), रामदास थोरात (लोणी व्यंकनाथ), राजू कोरे (मढेवडगाव), चंद्रकांत सीनलकर, अन्सार शेख, अभिजीत रेपाळे (सर्व रा. श्रीगोंदे), अजित काकडे (लोणी व्यंकनाथ), रामदास शेलार (बेलवंडी), सतीश लगड (कोळगाव), किशोर पवार (बेलवंडी स्टेशन), नाना सय्यद (श्रीगोंदे), मोहन डांगे (नागवडे कारखाना), सचिन भडांगे, बी. डी. पानसरे (तलाठी, बेलवंडी), हमशोद्दीन शेख (मंडलाधिकारी, बेलवंडी), पांडुरंग निंभोरे (घोटवी), विलास म्हस्के (श्रीगोंदे), राजेंद्र क्षीरसागर (श्रीगोंदे), अजित ओसवाल व तत्कालिन दुय्यम निबंधक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT