Woman Gets United For Liquor Ban 
पश्चिम महाराष्ट्र

नऊ दारू दुकाने, बिअर बारवर गंडांतर ; आता खाकीच्याच हातात भवितव्य

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : विभागात दारूबंदीसाठी महिलांनी उभारलेला लढा दिवसेंदिवस तीव्र बनू लागलेला आहे. तळमावले आणि ढेबेवाडीतील परवानाप्राप्त नऊ दारू दुकाने आणि बिअर बारवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गावोगावी वर्षानुवर्षे पोसलेल्या अवैध दारूगुत्यांचे काय होणार? अधिकृत दुकाने बंद झाल्यावर हे काळे साम्राज्य आणखीच वाढणार का? आदी प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आले आहे.

हेही वाचा -  सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?
 
डोंगर दऱ्याखोऱ्यात विखुरलेले ढेबेवाडी खोरे अनेक वर्षांपासून काळ्या धंद्यांनी अक्षरशः पोखरले आहे. मटका, दारूधंदे, वडाप, जुगार अशा काळ्या धंद्यांचे ढेबेवाडीत मुख्यालय आहे. अनेक गावांत त्यांच्या शाखाही विस्तारल्या आहेत. आतापर्यंतच्या काही जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांनी ही विषवल्ली उखडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंपणच चोरांना सामील असल्यासारखे चित्र असल्याने विषवल्लीला पुन्हा पुन्हा फुटवे फूटत आहेत. विभागात फोफावलेल्या अवैध दारूधंद्यांनी आता सर्वच सीमा पार केल्या आहेत. ढेबेवाडीत पाच, तळमावलेत चार परवाना प्राप्त दारू दुकाने व बिअरबार आहेत.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तेथे मद्यपींची गर्दी असते. त्यात भरीस भर म्हणून गावोगावी, वाड्यावस्त्यांवरही बेकायदा दारूअड्ड्यांची बजबजपुरी वाढली आहे. येथील पोलिस यंत्रणा वारंवार दारूअड्ड्यांवर छापे टाकते. मात्र, ज्यांच्याकडे जबाबदारी जाते तो उत्पादन शुल्क विभाग वर्षानुवर्षे गुंगीत असल्याने पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. विभागात अवैध दारूचे अनेक घाऊक, किरकोळ विक्रेते आहेत. अन्य व्यवसायाच्या आडून त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला आहे.

जरुर वाचा - दहावीचे विद्यार्थी, पालकहाे तुमच्यासाठी... 

कारवाईत दहा- वीस बाटल्या विकणारे पोलिसांच्या हाताला लागतात. मात्र, टेंपोने माल आणणारे सप्लायर नामानिराळेच राहात आहेत. त्यांच्या प्रोत्साहनावर अड्डे पुन्हा पुन्हा बाळसे धरत आहेत. तळमावले, मंद्रुळकोळेतील महिलांनी ग्रामपंचायत कक्षेतील दारू दुकानांच्या विरोधात एल्गार केल्याने नऊ दुकानांचे भवितव्य अडचणीत आहे. तळमावल्यात महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, तेथे आता मतदानाची कार्यवाही सुरू आहे. मंद्रुळ कोळ्यात 27 डिसेंबरला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिलांच्या विशेष ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित असल्याने तिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आता खाकीच्याच हातात भवितव्य... 

तळमावलेत 660, तर मंद्रुळकोळ्यात एक हजार 471 महिला मतदार आहेत. नऊ दारू दुकाने आणि बिअर बारवर गंडांतर येण्याची चिन्हे असतानाच गावोगावी वर्षानुवर्षे पोसलेल्या 100 हून अधिक अवैध दारूगुत्यांचे काय होणार? अधिकृत दुकाने बंद झाल्यावर ही अवैध धंदेवाल्यांची पिलावळ आणखीन वाढणार का? आदी प्रश्नही चर्चेत आले आहेत. पुढच्या काळात स्थानिक पोलिस, उत्पादन शुल्कची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, 100 टक्के दारूबंदीचे आणि विभागातील शांततेचे भवितव्य त्यांच्याच हातात आहे. 

हेही वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT