Stored Water In Satara District  
पश्चिम महाराष्ट्र

दुष्‍काळात येथे पिकंतय पाणी

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : नेहमीचाच दुष्काळ...त्याला लागून येणारी संकटे...आणि जीवन जगण्यासाठीची धडपड...हे चित्र आता इतिहासजमा होण्याची आशा माणकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी आडवा योजनेला आता मूर्त रूप येऊ लागलंय. इतकेच नव्हे तर जलसंधारणाच्या यशस्वी कार्यक्रमामुळे काही गावे स्वावलंबनकडे वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे भविष्यात दुष्काळाचे चटके आता नक्कीच सुसह्य होणार आहेत. 

शासनाने कायमस्वरूपी पाणी देण्यासाठीच्या उरमोडी योजनेतून आता पाणी उपलब्ध झाले. जिहे- कठापूर योजनाही पूर्ण होईलच; परंतु याखेरीज पावसाचे पाणी अडविण्यासाठी गेल्या काही वर्षांत क्रांती घडली. लोकांचा उत्स्फूर्त सहभागातून तालुक्‍यातील बहुतांशी गावात जलसंधारणाची कामे केवळ हाती न घेता पुढाकाराने पूर्ण करण्यात आली. गेल्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 66 गावे वॉटर कप स्पर्धेत उतरली. या प्रत्येक गावात स्पर्धा होती. मात्र, ती पाणी मिळविण्याचीच. यात सर्वच गावे यशस्वीही झाली. 

यंदा झालेल्या पावसाने तर या कार्यक्रमाला बळकटी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. निरंतर झालेल्या जलसंधारण कामाने लोधवडे स्वयंपूर्ण झालेच; शिवाय इतर गावांसाठीही ते जलसंजीवन बनले. याशिवाय बिदाल, टाकेवाडी, बनगरवाडी, भांडवली, मार्डी, इंजबाव, किरकसाल, वाघमोडेवाडी ही गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली आहेत. याशिवाय काळेवाडी, धामणी, चिलारवाडी, महाबळेश्वरवाडी, पानवण, कारखेल, दिवड, नरवणे, कुकुडवाड, अनभुलेवाडी, कळसकरवाडी, गाडेवाडी, शिंदी, परकंदी, कासारवाडी, स्वरूपखानवाडी, बोथे, जाधववाडी, वावरहिरे, भाटकी, रांजणी, गोंदवले खुर्द, पिंगळी या गावांनीही जमिनीत पाणी साठविण्याची किमया करून दाखवली. 

यंदा दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात यश आले. लोकांनी खोदलेल्या समतल चरी पाण्याने भरून वाहिल्या, तर नालाबांध, दगडी बांध, छोटे-मोठे पाझर तलावही पूर्ण भरले. कधी नव्हे ती माण नदीही अनेक वर्षांनी वाहिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून जमिनीतील खालावलेली पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी दुष्काळाला टाटा करत पाण्याच्या बाबतीत आता तालुक्‍यातील अनेक गावे स्वावलंबनाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहेत. 


आम्ही प्रामाणिकपणे केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे सार्थक झाले. आता भविष्यात दुष्काळाशी झगडावे लागणार नाही याचा खूप आनंद होतोय.

- चंदूभाई डांगे, बिदाल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Latest Marathi News Live Update : कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

SCROLL FOR NEXT