Whale Fish Vomit esakal
पश्चिम महाराष्ट्र

Whale Fish Vomit : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; सांगली, कोल्हापूर, लातुरमधील पाच जणांना अटक

व्हेल माशाच्या (Whale Vomit) उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या सांगली, कोल्हापूर (Kolhapur), लातूर जिल्ह्यांतील पाच जणांना अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

आरोपींना शिराळा न्यायालयात (Shirala Court) हजर केले असता गुरुवारपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथे वनविभागाने (Sagaon Forest Department) व्हेल माशाच्या (Whale Vomit) उलटीची (अंबरग्रीस) तस्करी करणाऱ्या सांगली, कोल्हापूर (Kolhapur), लातूर जिल्ह्यांतील पाच जणांच्या टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना, पाच मोबाईल, दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

त्यांना शिराळा न्यायालयात (Shirala Court) हजर केले असता गुरुवारपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. ही घटना काल (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास सागाव येथे घडली. रोहन सर्जेराव पाटील (वय २९, कोनवडे, ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (२३, सुळंबी, ता. राधानगरी), दिग्विजय उत्तम पाटील (२४, रा. सागाव, ता. शिराळा, जि. सांगली), लक्ष्मण सुखदेव सावळे (३४, रा. लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई), दत्तात्रय आनंदराव पाटील (४१, रा. बिऊर, ता. शिराळा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत वन विभागातून समजलेली माहिती अशी, सागाव येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागास गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सागाव येथील पेट्रोल पंपावर सापळा लावून यातील एक जण बनावट ग्राहक बनून गेले. संशयित दत्तात्रय पाटील हा बनावट ग्राहकांची भेट घेऊन व्हेल माशाच्या उलटीचा नमुना दाखविण्यासाठी आणतो म्हणून गेला.

अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील सहकारी रोहन पाटील, प्रथमेश मोरे, दिग्विजय पाटील, लक्ष्मण सावळे, दत्तात्रय पाटील असे पाच पेट्रोल पंपावर आले. त्यांनी बॅगेमध्ये असलेला उलटी (अंबरग्रीस)चा ८ ग्रॅमचा नमुना दाखवला. बनावट ग्राहकाने बऱ्याच व्यवहारात आपली फसवणूक झाली आहे, त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले. त्यावेळी सर्वजण चर्चा करताना त्यांच्याकडे असलेल्या मुद्देमालाची खात्री दबा धरून बसलेल्या वन अधिकाऱ्यांना झाली.

त्यानंतर त्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांना शिराळा न्यायालयाने गुरुवारपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक हणमंत पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनिकांत दरेकर, बाबासो गायकवाड, मोहन सुतार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT