पश्चिम महाराष्ट्र

सातारकरांनाे तुमचा वाहन परवाना सस्पेंड हाेऊ शकताे

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अपघातांची संख्या कमी करून जखमी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांकडून प्रबोधनाबरोबर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार 41 जणांवर लायसन्स निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणाऱ्यांकडूनही सुमारे 30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

रस्ते अपघातातील जखमी व मृत्यूंची संख्या पाहता रस्ता सुरक्षिततेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयानेही वेळावेळी निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहनचालकांवर कारवाई करत असते. त्यामध्ये काही गंभीर स्वरूपाच्या व अपघाताला जास्त कारणीभूत ठरणाऱ्या गुन्ह्यांबद्दल उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून संबंधित वाहनचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी निलंबित करण्यात येतो. येथील उप्रादेशिक परिवहन विभागानेही गेल्या वर्षभरात अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई केली आहे. 

Video : चला फ्लेमिंगोसह रंगबेरंगी पक्षी निरीक्षणासाठी

त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या कारणासाठी 90 दिवसांसाठी तर, मद्यपान किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर 180 दिवसांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

 तीच्या प्रामाणिकपणास पोलिसांचा सलाम

याबरोबरच हेल्मेटचा वापर न करणे तसेच सिटबेल्टचा वापर न करणाऱ्यांवरही उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस दलानेही कारवाई केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने 514 कारवाया करून दोन लाख 57 हजार रुपयांचा दंड वसूल केला तर, पोलिसांनी 848 कारवाया करून एक लाख 49 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. तर, सिटबेल्टचा वापर न करणाऱ्या 198 जणांवर कारवाई करून उपप्रादेशिक परिवहन विभागाने 59 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे, तर पोलिसांनी 15 हजार 230 कारवाया करून 25 लाख 50 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे.

Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग

कारवाई करण्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट व सिटबेल्टबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करण्याबाबतीही निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने हेल्मेटबाबत 453 जणांचे तर, सिटबेल्टबाबत 165 जणांचे समुपदेशन केले आहे. त्याचप्रमाणे पोलिस विभागाने हेल्मेटबाबत एक हजार 31 तर, सिटबेल्टबाबत 15 हजार 897 जणांचे समुपदेशन केले आहे. 


गुन्ह्याचा प्रकार : निलंबन कालावधी (दिवस)  : लायसन्सची संख्या 

मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे 90 59
लाल सिग्नल ओलांडणे 90 45
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे 90 151
मद्यपान करून वाहन चालविणे 180 31
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे 90 895


अपघातमुक्त रस्ते ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. त्यामुळे आपण अपघातांची संख्या कमी करून अनेक कुटुंबांवर येणारे दु:खाचे सावट दूर करू शकतो.

संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT