Fake Notes Seized Vishrambag Police esakal
पश्चिम महाराष्ट्र

Fake Notes : सांगलीत 'इतक्या' लाखांच्या बनावट नोटा जप्त; विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई, संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील

अटक करण्यात आलेले तिघेही संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

सकाळ डिजिटल टीम

यापूर्वीही बनावट नोटांचा कारखानाच सांगली पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.

सांगली : विश्रामबाग येथील कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ साडेचार लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. साऱ्या नोटा बनावट असून संशयित कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आहेत.

वाहीद रफिक पठाण (वय २३, रा. यादव नगर, जयसिंगपूर), जमीर शौकत बागवान (३८, इरगोंडा पाटील नगर, कबनूर, इचलकरंजी) आणि संतोष श्रीकांत हत्ताळे (३२, संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) अशी त्या संशयितांची नावे आहेत.

साऱ्या नोटा पाचशेच्या असून त्या कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी (Vishrambag Police) दिलेली माहिती अशी की, बनावट नोटा बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिले आहेत.

त्यानुसार विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ तिघेजण संशयास्पद रित्या आढळून आले. त्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी झडती घेतली असता त्यांच्याकडील सॅकमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. सखोल चौकशी केली असता त्या पाचशेच्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

तब्बल चार लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या नोटा कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, तिघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्या नोटा बाजारपेठेत खपवण्यासाठी आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहायक निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करत आहेत.

कोल्हापूर कनेक्शन

अटक करण्यात आलेले तिघेही संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यापूर्वीही बनावट नोटांचा कारखानाच सांगली पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर अनेकदा बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात अनेकदा कोल्हापूर कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून पाळेमुळे खणण्याचे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Latest Marathi News Live Update : पूरग्रस्तांना भरघोस मदतीसाठी ठाण्यात ठाकरे गटाचे आंदोलन

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

3 Ingredient Kaju Katli for Diwali: यंदाची दिवाळी साजरी करा हेल्दी पद्धतीने; घरीच बनवा फक्त ३ पदार्थांपासून काजू कतली

SCROLL FOR NEXT