Laingik Atyachar 
पश्चिम महाराष्ट्र

कोण रोखणार सोलापुरातील गुन्हेगारी?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच सोलापुरात घडली. सुरक्षारक्षकानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याचा पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असे नाही; तर अशा घटना सतत घडत आहेत. गुन्ह्याची नोंद न होणाऱ्या अशा अनेक घटना आहेत, ज्या समोरही येत नाहीत. यातून सोलापुरात महिला व चिमुकल्या सुरक्षित नाहीत, याचे वास्तव समोर आले आहे. फक्त अत्याचार होतोय असं नाही तर चिमुकल्यांचे अपहरण करून हत्याही होत आहेत. चोरीच्या घटना सतत घडत आहेत. यावरून सोलापूर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी वेळीच या प्रकारावर आळा घालावा, अशी आशा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

सुरक्षारक्षकांवरील विश्‍वासाला बसला तडा
सोलापूर शहरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी सात पोलिस स्टेशन आहेत. त्याअंतर्गत विविध ठिकाणी 23 पोलिस चौक्‍या कार्यरत आहेत. तरीही महिला व मुलींच्या संरक्षणासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे घडलेल्या घटनांवरून उघड होत आहे. घरफोडी, चोऱ्या, लूट, फसवणूक या घटना तर दररोज कोठे ना कोठे घडत आहेत. अत्याचार कमी व्हावेत म्हणून वेगवेगळी पथके, महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन असल्या तरी याबाबत पुरेशी जागृतीच होत नसल्याने त्या कागदावरच राहात असल्याचे सतत घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. तिथेही नेहमीच अशा घटना घडत आहेत. याला फक्त पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही; मात्र जेव्हा 65 वर्षांचा वृद्ध सुरक्षारक्षकच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतो, तेव्हा कोठे गेली मानसिकता आणि सुरक्षाव्यवस्था, असा प्रश्‍न निर्माण होतो. शहरात अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या विश्‍वासावर बालकांना सोडून आई-वडील कामाला जातात, तेव्हा सुरक्षारक्षकांवरील विश्‍वासालाही या घटनेमुळे तडा बसला आहे, असे म्हणावे लागेल आणि या सुरक्षारक्षकांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असाही प्रश्‍न यातून निर्माण होत आहे.

मुलांसोबत साधावा पालकांनी संवाद
बाल लैंगिक अत्याचाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. तसेच या अत्याचारास पूर्णत: पालकच जबाबदार असू शकतो. त्यांनी पाल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वयाच्या 13 वर्षांपासून मुले अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यानंतर बहुतांश बालके पालकांसमोर व्यक्त होत नाहीत. मुलांसोबत संवाद साधून पालकांनी सुदृढ नागरिक म्हणून त्यांच्याबाबतीत दक्ष राहायला हवे.
- प्रा. डॉ. निशा वाघमारे, वालचंद महाविद्यालय

मुलांनी हनुमान तर पुरुषांनी व्हावे राम
आपल्याच आजूबाजूला नेहमीच बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत यासाठी आईवडिलांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलांना प्रत्येक गोष्टीची माहिती करून दिली पाहिजे. तसेच टीव्ही, मोबाईल ही साधने देखील या अत्याचारास बळी पडण्याचे मोठे कारण आहे. सरकारने कायदा इतका कडक करूनही घटना कमी न होता वाढतच चालल्या आहेत. यामुळे मुलांनी हनुमान तर पुरुषांनी राम व्हायला हवे. म्हणजे अशा घटना घडणार नाहीत.
- लता फुटाणे, माजी नगरसेविका

मोबाईलच्या आहारी जाताहेत मुले
बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना या आपल्या जवळच्या नातेवाइकांकडूनच होत असतात. सहसा नामवंत लोकांसोबत अशा घटना घडत असतात. यामुळे पालक-शिक्षक-नातेवाईक अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे पालकच मुलांना चुकीच्या गोष्टी पटवून देतात आणि होणाऱ्या घटनांवर पांघरूण घालण्याचे काम करतात. अशा वातावरणामुळे पाचवीत शिकत असलेली मुलेही मोबाईलमुळे अशा घटनांच्या आहारी जात आहेत.
- नूसरतखान पहाडे, मानसोपचारतज्ज्ञ

मुलामुलींना द्यावेत लैंगिक शोषणासंदर्भात धडे
एका दिवसाला 109 बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना या जवळच्या माणसांकडूनच घडत असतात. परंतु आपले पालक या गोष्टींवर विश्‍वास ठेवत नाहीत. या घटना थांबवायच्या असतील तर मुलांशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे. तसेच मुलींना बाहेर पडताना रिक्षा, बसचा प्रवास करताना अशा प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. हिंसाचार थांबवायचा आणि संपवायचा असेल तर प्रत्येक मुलामुलीला लैंगिक शोषणासंदर्भात प्रशिक्षण आणि धडे दिले पाहिजे.
- सरोजिनी तमशेट्टी, विधिज्ञ

पालकांनी मुलांना वेळ देणे महत्त्वाचे
बाल लैंगिक अत्याचाराची माहिती परिवारासोबत संवाद नसल्याने होत नाही. मुले सोशल मीडियामुळे अर्धवट माहिती घेऊन अशा घटनांच्या आहारी जातात. त्यामुळे अशी विकृती वाढत चालली आहे. मुले मनातील प्रश्‍न पालकांसमोर मांडत नाहीत. त्यांना बोलते केले पाहिजे. यामुळे आईवडिलांनी मुलांसोबत बोलणे, त्यांना वेळ देणे, प्रत्येक गोष्टीबद्दल पटवून देणे हे सर्व खूप महत्त्वाचे आहे.
- चंद्रिका चव्हाण, सदस्या, महिला आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT