Information and Publicity Department
Information and Publicity Department  
पश्चिम महाराष्ट्र

शासन आणि जनतेला जोडणारा सेतू 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  -  शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि माहिती जनतेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसिद्धी विभागाची असते. शासन आणि जनता यांना जोडणारा महत्वाचा "सेतू' आहे. शासनांचे उपक्रम जनता आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचवण्याची दुहेरी जबाबदारीही विभाग पार पाडते. 

शासन कल्याणकारी योजना, धोरणे आणि अभियान जनतेपर्यंत पोचविण्याचे काम विभाग करते. योजनांची माहिती प्रसिद्ध करताना वृत्त अन्य वृत्तपत्रांना देणे, वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या प्रसारित करणे या जबाबदाऱ्या हा विभाग पार पाडते.

कल्याणकारी योजना, माहिती व जागृती कार्यक्रम घेण्यासाठी प्रचारफेरी आयोजित करणे, प्रदर्शने भरविणे किंवा व्याख्यान आयोजित केले जाते. शासनासंबंधीची माहिती पुरविणे आणि शासकीय जाहिरातीचे विविध वृत्तपत्रांना वाटप करणे आदी कामही या विभागातर्फे केले जाते. शासकीय ध्येयधारणे आणि कार्यक्रमासंबंधीची सर्वसाधारण प्रतिक्रिया आणि एकूण स्वरुप या संबंधीची माहिती शासनाला सतत पुरविले जाते. तसेच रोजच्या कामापेक्षा वेळोवेळी विविध उपक्रम शासनाच्या अनेक खात्यांच्या सुचनेनुसार हाती घेतले जातात. माहिती व प्रसिध्दी विभाग येथून प्रसारमाध्यमांसाठी प्रसिध्दीसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये कन्नडसह मराठीत माहिती असते. पण, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ कन्नडमधूनच माहिती प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे. 

माहिती व प्रसिद्धी खात्याच्या जिल्हा उपसंचालकपदी सनदी अधिकारी असतात. मुख्य कार्यालय बंगळूरला आहे तर, जिल्हा उपसंचालकपद बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे. शिरस्तेदार आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण येथे पुरक मनुष्यबळ नाही. 

कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत 
माहिती व प्रसिद्धी विभागाकडून कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते. पण, विधानसभा, लोकसभा किंवा अन्य निवडणुकीत आचारसंहिता उल्लंघन नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी जबाबदारी पार पाडली जाते. जाहिरात खर्च, पेड न्यूज आणि तपशील संकलनाची जबाबदारी माहिती आणि प्रसिद्धी विभागाची असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT