Against GST Trade closed across the country on Friday kolhapur marathi news 
कोल्हापूर

‘कॅट’ची हाक: कोल्हापुरात होणार चक्का जाम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ आले आहेत; मात्र ते केवळ सरकारला आणि सरकारी अधिकाऱ्यांना आहेत. ‘जीएसटी’मध्ये झालेले बदल अन्यायकारक आहेत. त्या विरोधात शुक्रवारी (ता. २६) देशव्यापी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ‘कॅट’चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आज येथे केले.

 कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तेथे सर्व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. या वेळी चक्का जाम करण्यात येणार असल्याचेही  पाटील यांनी स्पष्ट केले. ‘कॅट’चे उपाध्यक्ष पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘आजपर्यंत ९०० वेळा जीएसटी कायद्यात बदल केला. छोटे आणि मोठे व्यापारी असे दोन गट पाडले. देशभरात सामाजिक दुहीचे काम सरकार करते. पुन्हा एकदा ‘इन्स्पेक्‍टर राज’ आणले जात आहे. त्यांना तुमचा व्यवसाय, कर, अकौंट सर्व काही बंद करण्याचा अधिकार दिला. याबाबत तुम्हाला थेट न्यायालयात जाऊन काही दोष नसल्याचे स्पष्ट करावे लागणार आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांना असे अधिकार नव्हते. अशा अनेक बदलांमुळे व्यापाऱ्यांनी बंदचे आवाहन केले आहे. त्याला पाठिंबा द्यावा.’’

चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा यांनी जीएसटी कसा चुकीचा आहे, हे विस्ताराने सांगितले. कायद्यातील बदल हा त्या वेळेपासून किंवा त्यापेक्षा पुढील कालावधीपासून असू शकतो; पण येथे २०१७ पासून बदल केला गेला आहे. दहा लाखांसाठी साडेतीन लाख कर, दंडाची रक्कम असू शकते काय? मात्र, ‘जीएसटी’मध्ये असे होते. ‘जीएसटी’ भरल्याशिवाय आयटी रिटर्न भरू शकत नाही. अशा जाचक कायद्यांना विरोध करणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

‘जीएसटी’च्या विरोधात शुक्रवारी देशभर व्यापार बंद

चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी ‘कॅट’ने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक संघटनांनी आणि वाहतूक संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. चक्का जामही करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया व संचालक अजित कोठारी यांनी मार्गदर्शन केले. मानद सचिव जयेश ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, राजू पाटील, वैभव सावर्डेकर, संचालक भरत ओसवाल, विज्ञानंद मुंढे, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, तसेच सर्व सभासद व व्यापारी उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात
 देशातील आठ कोटी व्यापारी ‘बंद’मध्ये सहभागी
 साडेतीन कोटींवर ट्रकधारक चक्का जाम करणार
 जिल्ह्यातील १५० हून अधिक संघटना ‘बंद’मध्ये सहभागी
 अत्यावश्‍यक सुविधा वगळून सर्व व्यापार बंद राहणार
 ट्रक वाहतूकही बंद राहणार, सर्व व्यापारी दुकाने बंद राहणार
 जिल्हाधिकारी, स्टेट आणि सेंट्रल जीएसटी कार्यालयात निवेदन देणा

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT