Ichalkaranji love Affair esakal
कोल्हापूर

Love Affair : धक्कादायक! प्रेमसंबंधातून इलेक्ट्रिक वायरने महिलेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न

झटापट व आरडाओरडा करत वेळीच तावडीतून सुटल्याने महिलेचा जीव वाचला.

सकाळ डिजिटल टीम

दोघांमध्ये वाद झाल्याने महिलेने पागडे याच्या सोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले होते. सबंध संपल्याबाबत महिलेने स्टँप पेपरवर लिहूनही घेतले होते.

इचलकरंजी : प्रेमसंबंधातून (love Affair) एकाने महिलेचा इलेक्ट्रिक वायरने (Electric Wire) गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दिलीप राजेंद्र पागडे (वय ३४, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

झटापट व आरडाओरडा करत वेळीच तावडीतून सुटल्याने महिलेचा जीव वाचला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली. ही घटना काल (बुधवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात (Shahapur Police Station) झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला व दिलीप पागडे यांची गेली चार वर्षांपासून ओळख आहे. यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाल्याने महिलेने पागडे याच्या सोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले होते. सबंध संपल्याबाबत महिलेने स्टँप पेपरवर लिहूनही घेतले होते.

तरीदेखील पागडे याने वारंवार महिलेचा कामावर येता-जाता पाठलाग करत संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिलेला तिच्या घरासमोर अंगणात गाठले. महिलेच्या पाठीमागून येवून घरात प्रवेश केला. तिला ठार मारण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने गळा आवळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री; साकारणार भरतची भूमिका

Latest Marathi News Live Update : लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

India Test Cricket: भारतीय कसोटी क्रिकेटचे पाच मजबूत आधारस्तंभ निवृत्त; आता फक्त रवींद्र जाडेजा मैदानात

Ayodhya Jhulotsav: अयोध्येतील राम-सीता झोपाळ्यावर! झुलनोत्सवामागची कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या खास परंपरा

SCROLL FOR NEXT