Balinga Bridge on Kolhapur-Gaganbawda Road esakal
कोल्हापूर

Balinga Bridge : महापुराचा धोका! कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील 'या' महत्वाच्या पुलावरून आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद

वाहतुकीसाठी कोणतीही रिस्क न घेता जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी सर्वच वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील पाटील

पुराचे पाणी रस्त्यावर आले नसतानाही अचानक पूल बंद करून वाहतूकदारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप लोकांकडून करण्यात आला.

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील (Kolhapur-Gaganbawda road) बालिंगा पूल (Balinga Bridge) धोकादायक स्थितीत असल्याने आज (ता. 25) पासून या पुलावरून पूर्ण वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असंही त्यांनी नमूद केलं. बालिंगा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाचे काम केले जाणार होते. अजून पर्यायी पुलाचे काम सुरू नाही. दरम्यान, सध्या असणाऱ्या पुलाला पाणी लागल्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

त्यामुळे वाहतुकीसाठी कोणतीही रिस्क न घेता जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी सर्वच वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुराचे पाणी वाढल्यामुळे काल दुपारी अचानक कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक बालिंगापूर येथे बंद करण्यात आला. त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना घरी परत येता येत नव्हते.

पोलीस आणि वाहतूकदारांमध्ये जोरदार वाद झाले. पुराचे पाणी रस्त्यावर आले नसतानाही अचानक पूल बंद करून वाहतूकदारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप लोकांकडून करण्यात आला. दरम्यान, आजपासून हा रस्ता दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हेल्मेट सक्ती! पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदेश; नियम मोडल्यास सेवापुस्तकात होणार नोंद, रस्ते अपघातात एका वर्षात १५००० मृत्यू, वाचा...

Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदारांनी अडवलेला टँकर गावात!; ग्रामस्थ आनंदीत; तहानलेल्या चिंचवनवासीयांची वणवण आता थांबणार

Panchang 13 April 2026 : सोमवार पंचांग! आजचा दिवस शुभ की अशुभ? जाणून घ्या वरुथिनी एकादशी, मुहूर्त

Best Low-Calorie Breakfast: डायट फॉलो करताय? मग नाश्त्यात हा लो-कॅलरी आणि हाय-न्यूट्रिशन स्मूदी बाउल नक्की ट्राय करा

आजचे राशिभविष्य - १३ एप्रिल २०२६

SCROLL FOR NEXT