Bhogavati Sugar Factory Election esakal
कोल्हापूर

Bhogavati Factory Election : 'भोगावती'साठी चुरस वाढली; बिनविरोधची चर्चा सुरु असतानाच ताकद आजमावण्याचे छुपे प्रयत्न, कोण मारणार बाजी?

भोगावती साखर कारखान्यासाठी माघारीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर आहे.

राजू पाटील

छुप्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली ताकद आजमावून समविचारी कसे जोडले जातील यासाठी हालचाल करू लागले आहेत.

राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Bhogavati Sugar Factory Election) माघारीची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे बिनविरोधची चर्चा आणि तिसरीकडे प्रत्येकाने आपापली ताकद आजमावण्याचे छुपे प्रयत्न सुरू केले आहेत.

सत्ताधारी आणि विरोधी गटाकडूनही आपल्याला सोयीचे मित्र गट कसे मिळतील यासाठी चाचपणी सुरू ठेवली आहे. यामुळे सध्याचा रंग पाहता बिनविरोधची चर्चा आणि निवडणुकीची जुळवाजुळव हे प्रकार सुरू आहेत. भोगावती साखर कारखान्यासाठी माघारीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर आहे. यानंतर रणधुमाळी सुरू होईल.

त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून बिनविरोधची भाषा पुढे आल्याने हा कारखाना बिनविरोध करून आर्थिक अडचणीतून काढण्यासाठी वक्तव्ये केली जात आहेत. सभासदांच्या संपर्क मेळाव्यामधून हा सरळ सूर आळविला जातानाच एकमेकाची उणीदुणी काढण्याचेही सुरू आहे. बिनविरोधसाठी एक बैठक झाली. त्यानंतर फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. मात्र छुप्या पद्धतीने प्रत्येकजण आपापली ताकद आजमावून समविचारी कसे जोडले जातील यासाठी हालचाल करू लागले आहेत.

विद्यमान संचालक मंडळाकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी आणि करवीर तालुक्यातील सभासदांचे मेळावे झाले. यानंतर कोल्हापूर येथे शहरवासीय सभासदांचा मेळावा झाला. दुसरीकडे विरोधकांनी सर्वपक्षीय एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी एकमेकांशी संधान साधले आहे. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, सदाशिवराव चरापले गट,भाजप, शेतकरी संघटना, शिवसेना यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला सावता सुभा ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT