corona lab nashik sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : कोरोना तपासणीत आढळली तफावत

शासकीय तपासणीत कमी; खासगीत जास्त बाधित, लोकांत भीतीचे सावट

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मुंबई पुण्या पाठोपाठ जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. काल (ता. ७) एका दिवसांत १७६ नवे कोरोनाबाधित सापडल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हा शासकीय सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत ९०० स्वॅब चाचणीत फक्त ४० जण कोरोनाबाधित सापडले; तर खासगी प्रयोगशाळेत ५७९ चाचण्यापैकी १५३ व्यक्ती बाधित सापडल्या. बाधितांच्या संख्येतील ही तफावत सुन्न करणारी आहे.

कोरोना वाढला की, लॉकडाउन होतो यांची भीती बहुतेकांना आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येवर चिंता व्यक्त होत आहे. राज्यातील शासकीय प्रयोग शाळातील तपासणीत बाधितांचे प्रमाण शंभरात सरासरी ३ टक्के आहे; तर खासगी तपासणीत शंभरात ३ ते १२ टक्के असे प्रमाण आहे. त्यानुसार खासगी प्रयोगशाळेत बाधित अधिक तर शासकीय प्रयोगशाळेत बाधित सापडण्याचे प्रमाण नगन्य आहे. तज्‍ज्ञांच्या मतानुसार सर्दी, ताप, खोकला, घशात, खवखव तसेच फुप्फुसात किंवा नाकातील संसर्ग असल्यास कोरोनाची लक्षणे मानली जातात. अशांचे स्वॅब तपासणी होते.

चाचण्या वाढल्या तेव्हा बाधित वाढले असेही दिसते. ज्या जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळा नाहीत अशा स्वॅब तपासणी नजीकच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणी होते तेथेही कोरोनाबाधितांचे प्रमाण शंभरात २ ते ४ आहे. शहरात अनेकजण खासगीत उपचाराला जातात. तेव्हा लक्षणे असली किंवा नसली तरी कोरोना चाचणी करावी लागते. तिथेच खासगीत स्वॅब तपासणी करून घेतली जाते. शहरात रुग्ण संख्या वाढ तर ग्रामीण भागात स्वॅब तपासणीच्या खासगी सोय नसल्याने तेथे बाधितांचे प्रमाण कमी दिसते.

कोल्हापुरातील खासगी लॅबमधील चार दिवसांतील बाधित

दिवस स्वॅब तपासणी बाधित संख्या

  1. ३ जानेवारी २६४ २६

  2. ४ जानेवारी ४३६ ३७

  3. ५ जानेवारी ४७२ ६५

  4. ६ जानेवारी ३७१ ९२

प्रवास करून शहरात येणारे जास्त असतात. त्यातील जे आजारी आहेत ज्यांना कोरोना सदृश लक्षणे आहेत. अशा व्यक्ती खासगी रुग्णालयात जातात त्यांचे नमुनेही खासगी प्रयोग शाळेत तपासले जातात. त्यातून बाधितांचे प्रमाण खासगीत जास्त दिसते. तर शासकीय प्रयोग शाळेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचेमधून येणारे स्वॅब जास्त आहेत.

- डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

खासगी प्रयोग शाळेत बाधितांची वाढती संख्या दिसते हे खरे आहे; मात्र येथे कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्ती तपासणीला येण्याचे प्रमाण जास्त आहे. एक व्यक्ती बाधित सापडली तर त्यांच्या घरातील संपर्कातील व्यक्तींची येथे तपासणी होते. त्यातील काही बाधित सापडतात. ही माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेला ही कळवली जाते. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही होते. यात काहीवेळा घरातील व्यक्ती बाधित व गल्लीतील व्यक्ती निगेटिव्ह सापडतात.

- डॉ. आर. एस. पाटील, अंबिका लॅब (खासगी प्रयोगशाळा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google AI Hub India : सुंदर पिचाईंची मोठी घोषणा! गुगल भारतात ‘या’ राज्यात पहिलं ‘AI’ हब उभारणार

Pimpalgaon Baswant Crime : कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली 'धिंड'; दोघांना अवघ्या काही तासांत अटक

Latest Marathi News Live Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Yeola Election : येवला पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; १० पैकी ८ गणांवर इच्छुकांची सोय, सभापतीपदावर ओबीसीचा दावा

Vaidyanath Karkhana: गोपीनाथ गडाचा परिसर असलेल्या जमिनीचीही विक्री; 'वैद्यनाथ'कडे असलेली बाकी कोण देणार? पंकजा मुंडेंचं अजूनही मौनच

SCROLL FOR NEXT