Ambabai Mandir Kolhapur esakal
कोल्हापूर

Ambabai Temple : चप्पल स्टॅंड हटण्यावरून अंबाबाई मंदिराशेजारी मोठा राडा; काय आहे प्रकरण, पोलिसांनी का केला बळाचा वापर?

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

चप्पल स्टॅंडबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांच्या बळाचा वापर करत झालेली ही कारवाई बेकायदेशीर आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाशेजारील खासगी चप्पल स्टॅंड महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने काल (मंगळवार) पोलिस (Kolhapur Police) बंदोबस्तात हटवली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही कारवाई सुरू असताना स्टॅंडचालक व तेथील महिलांनी कारवाईला जोरदार विरोध केला.

अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कारवाई पूर्ण झाली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल विरोध करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले. न्यायालयात वाद प्रलंबित असताना पोलिसांच्या बळाचा वापर करत महापालिकेने ही कारवाई केल्याचा आरोप स्टॅंडचालकांनी केला.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिर (Ambabai Mandir Kolhapur) परिसरात महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चप्पल स्टॅंड हटवण्यासाठी कर्मचारी येताच स्टॅंडचालकांसह येथील महिलांनी जोरदार विरोध सुरू केला. प्रकरण न्यायालयात असताना कारवाई का, असा त्यांचा सवाल होता. पण, सुरक्षिततेच्या कारणास्तव स्टॅंड हटवण्यावर अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी ठाम होते.

त्यामुळे सुरुवातीला काही काळ झटापट झाली. मात्र, विरोध करणाऱ्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने येथील दहा चप्पल स्टॅंड हटवून ती जप्त करण्यात आली. येथील चार स्टूल आणि एक लाकडी कपाटही पथकाने जप्त केले. मात्र, तरीही स्टॅंडचालकांनी महापालिकेचा निषेध करत येथे बराच वेळ ठिय्या मारला. महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक सचिन जाधव, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Ambabai Mandir Kolhapur

डोक्यावर दगड आणि शंखध्वनी

कारवाई सुरू असताना एका महिलेने तर चक्क डोक्यावर दगड आपटून घेण्याचा प्रयत्न केला. स्टॅंडचालक व तेथील महिलांच्या शंखध्वनी आणि आक्रोशामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. गणेश पाखरे, जीवन पाखरे, प्रकाश कोरवी यांची ही चप्पल स्टॅंड आहेत.

कारवाई सुरूच राहणार

नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे स्वतंत्र चप्पल स्टँडची सोय करण्यात आलेली आहे. अतिक्रमण कारवाई पुढेही चालूच राहणार असून फेरीवाल्यांनी वाहतुकीस व पर्यटकांना कोणताही अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आज पुढील सुनावणी

चप्पल स्टॅंडबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांच्या बळाचा वापर करत झालेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. आजच या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होती. चाळीस वर्षे आम्ही येथे आहोत. तरीही कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता महापालिकेने कारवाई केली. या प्रकरणी पुढील सुनावणी आज (बुधवारी) होणार आहे. आज झालेल्या कारवाईविरोधातही न्यायालयात दाद मागणार असल्याचे गणेश पाखरे यांच्यासह स्टॅंडचालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT