कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट

 

esakal

कोल्हापूर

Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

Konkan Railway News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून प्रवाशांना आनंदाची भेट! लांब पल्ल्याच्या गाड्या आता काही नवीन स्थानकांवर थांबणार, प्रवास होणार अधिक सोयीस्कर.

Sandeep Shirguppe

Diwali Gift from Konkan Railway : कोकण रेल्वेमार्गावर सिंधुदुर्गात लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस व अजमेर मरू सागर एक्स्प्रेस आणि कणकवली रेल्वे स्थानकावर हिसार-कोयंबतूर एक्स्प्रेस व गांधीधाम नागर कोईल एक्स्प्रेस या चार गाड्यांना थांबा दिला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना ही दिवाळी भेटच मिळाली आहे.

रेल्वे बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून १७ ऑक्टोबरला आदेश जारी केला असून, लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनकुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून, रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली रेल्वे स्थानकांवर मागणीप्रमाणे लांब पल्ल्याच्या प्रत्येकी दोन गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे आदेश

सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-अजमेर मरुसागर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा दिला आहे. कणकवली स्थानकावर हिसार-कोयंबतूर एक्स्प्रेस आणि गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा दिला आहे. रेल्वे बोर्डाने स्थानिक स्तरावर तिकीट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे व या गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी, यासाठी या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT