Mobile App sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : हे ॲप डाउन लोड करा’, तासाला तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील

‘ॲग्री’च्या नावाखाली शंभरावर तरुणांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘तुम्ही पाचशे रुपये भरून ॲप डाउन लोड करा’,(Download app) त्यानंतर तासाला तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.'', (money will credited to your account)साधारण दिवसाला तुम्हाला १८ रुपये मिळणार. खात्यावर १५० रुपये जमा झाल्यानंतर ते काढता येतील. ‘ॲग्री’ या नावाशी संबंधित ॲपने शहर परिसरातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातला.

अनेक तरुणांच्या हातातील मोबाईल हॅण्डसेटच्या स्क्रिनवर (screen of a mobile handset) हे ॲप दिसत होते. मात्र ते ॲपच बंद झाल्यामुळे फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले आहे. प्रत्येकाची दोन-चार-पाच हजारांची फसवणूक झाल्यामुळे ते तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. असे सुमारे शंभरावर तरुण ॲपच्या मोहजाळात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच ॲपद्वारे फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसरातील काही तरुणांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडील माहितीनुसार, असलेले ॲप तुम्ही दुसऱ्याला डाउन लोड करण्यास प्रवृत्त केले तर त्याचा काही शेअर (१० रुपये) तुम्हाला मिळतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ॲप डाउनलोड झाल्यावर ५०० रुपयांचा रिचार्ज करायचा आहे.

रिचार्ज झाल्यावर त्याला लॉगीन मिळते. यानंतर त्याला तासाला रुपया- किंवा १ रुपया २० पैसे मिळतात. कर व इतर कपात करून ५०० रुपयांना दिवसाला १८ रुपये असा सर्वसाधारण त्यांचा हिशेब होता. काही तरुणांनी पाचशे नव्हे तर तीन ते पाच हजार रुपयांचे रिचार्ज केले. त्यांनाही त्याच पटीत मोबदला मिळू लागला. एकमेकांना माहिती देऊन त्यांनी ॲप घरोघरी पोचविले. नोव्हेंबर २०२१ पर्यंत सर्वांनाच लाभ मिळत होता. मात्र अचानक ॲप बंद झाला. यातून दबक्या आवाजात कोणाची किती रुपयांची फसवणूक झाली याची चर्चा वाढू लागली. हिरव्या रंगाचा वापर करून ॲग्रीचे ॲप मार्केटमध्ये आले होते. त्यात साधारण सात हजारांहून अधिक सदस्य असल्याची माहिती सोशल मीडियावर दिसत होती. दिल्लीकडील तरुणांकडून हे ॲप चालविले जात असल्याचे त्यांच्याच सोशल मीडियावरील माहितीवरून दिसून येते. दिल्लीतील हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमासह इतर तरुणांचे चेहरेही त्यांच्या ॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून दिसून येत होते.

नोव्हेंबरमध्ये बंद झालेले ॲप पुन्हा नव्या डिझाईनमध्ये दिसू लागले आहे. मात्र त्यात जुन्या सदस्यांचा कोणताही डाटा दिसून येत नाही. त्यामुळे ॲपद्वारे फसवणुकीचा हा ‘सेंकड पार्ट’ असल्याचे दिसून येत आहे.

- उत्तम नलवडे , वरणगे पाडळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT