Sangli IT Bogus Raid
esakal
Fake Income Tax Raid Sangli : अक्षयकुमारच्या ‘स्पेशल २६’ सिनेमाच्या स्टाईलने येथे तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या पथकाने छापा टाकून डॉक्टर कुटुंबाचे तब्बल १५ लाख रुपये आणि एक किलो ४१० ग्रॅम सोने लुबाडले. मध्यरात्री घडलेल्या घटनेने कवठेमहांकाळ शहर हादरून गेले आहे. हा प्रकार काल रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठेमहांकाळ शहरात झुरेवाडी रस्त्यावर डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉ. म्हेत्रे यांचे कुटुंब राहते. नेहमीप्रमाणे ते घरी गेले असता काल रात्री अकराच्या सुमारास तीन पुरुष आणि एक महिलेच्या टोळीने प्राप्तिकर विभागाचा छापा असल्याचे भासवत डॉ. म्हेत्रे यांच्या घराची झडती सुरू केली. घरातील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन महिलेसह चौघांनी पलायन केले. खळबळजनक प्रकारात १५ लाख ६० हजार रोख आणि एक किलो ४१० ग्रॅम सोन्याचे दागिने देखील पळविल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, घटनेबाबत डॉ. म्हेत्रे यांनी माहिती घेतली असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांनी दिली. महिलेसह अनोळखी चौघांच्या टोळीने प्राप्तिकर विभागाचा छापा असल्याचे भासवत डॉ. म्हेत्रे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन केलेल्या खळबळजनक प्रकाराची माहिती मिळताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या पथकाने तातडीने डॉ. म्हेत्रे यांच्या घरी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. घटनेची कवठेमंकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली. डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे.
फिल्मी स्टाईलने फसवणूक
शहरातील झुरेवाडी रस्त्यावरील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेसह अनोळखी चौघांनी फिल्मी स्टाईलने केलेला हा खळबळजनक प्रकार केल्याची चर्चा शहरात सुरू होती.
कवठेमहांकाळमधील डॉ. म्हेत्रे यांच्या घरी प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवत महिलेसह चौघांनी सोन्यासह रोकड पळविली. याप्रकरणी तपासाची पथके रवाना केली आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्वास जत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषणच पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.