Ichalkaranji Crime News Shahapur Police esakal
कोल्हापूर

Ichalkaranji : धक्कादायक! सुपारी देऊन पोटच्या गोळ्याचा बापानं केला खून; डोक्यावर वर्मी घाव, रक्ताचे थेंब अन्..

तारदाळ (ता. हातकणंगले) येथे वडिलांनीच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा प्रकार घडलाय.

सकाळ डिजिटल टीम

मृतदेहाच्या डोक्यावरचे वर्मी घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आले.

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे वडिलांनीच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा प्रकार घडलाय. राहुल दिलीप कोळी (वय ३१ रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

त्याच्या वडिलांनीच ७५ हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी दिली. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हाचा दाखल करत दिलीप कोळी, विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना ताब्यात घेतले.

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तारदाळ येथील दिलीप कोळीचा राहुल मुलगा आहे. तो विवाहित आहे. तो सतत मद्यपान करून कुटुंबाला त्रास देत होता. सततच्या त्रासाने त्याची पत्नी मुलांसह माहेरीच असते. राहुलच्या वागण्याला आई-वडील कंटाळले होते.

यावरून राहुलचे कुटुंबाबरोबर नेहमी भांडणे व्हायची. काल पहाटेच्या सुमारास राहुलचा मृतदेह तारदाळ माळावर आढळल्याची माहिती शहापूर पोलिसांना समजली. आयकॉनिक कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे पटरीच्या लगत राहुलचा मृतदेह सापडला. रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला; मात्र मृतदेहाच्या डोक्यावरचे वर्मी घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आले.

साळवे यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि घातपातच्या दृष्टीने तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांकडे चौकशी करत वडील दिलीप, भाऊ सचिन यांच्याकडे विचारणा केली. चौकशीत पोलिसांना वडिलांचा दाट संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. रात्री उशिरा कौटुंबिक वादातून वडील दिलीप कोळी यांनी दोन साथीदारांसह राहुलचा खून केल्याची कबुली दिली.

एकूण रोख ७५ हजार रुपये विकास पोवार व सतीश कांबळे यांना दिले. सुरुवातीला २५ हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचा व्यवहार झाल्याची स्पष्टता कोळी याने तपासात दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक माळी, योगेश अवघडे, प्रमोद भांगरे, आरीफ वडगावे, शशिकांत डोणे, असिफ कलेगार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा, घरकाम, स्वयंपाक करणारी बाई टिपिकल असते हे तुला कुणी सांगितलं? रिंकू राजगुरूच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा थेट प्रश्न

Bihar Election Explained: NDA अंतर्गत मोठा राडा! मोदींच्या खुर्चीला देखील हादरे, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

Nashik Police : दिवाळीत घरफोडी करणाऱ्यांची खैर नाही! नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांकडून दिवस-रात्र गस्ती पथकांत मोठी वाढ

Viral Video : क्या हाल है भाई! Rohit Sharma ने नवा कर्णधार शुभमनला पाहताच विचारला प्रश्न, विराट कोहलीला केला मुजरा; मन जिंकणारा क्षण

Latest Marathi News Live Update : पुण्यात भर रस्त्यावर तिघा जणाकडून बांबूने एका तरुणाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT