Farmer
Farmer sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : योजना चांगली; पण वापर कमी

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतीमालाला बाजारपेठेत(agro products) चांगला भाव आल्यानंतर त्याची विक्री केल्यास शेतकऱ्याला(farmer) चांगला नफा मिळू शकतो. मात्र, बाजारपेठेत चांगला भाव येईपर्यंत शेतकऱ्याला आपला शेतीमाल सुरक्षितपणे साठवून ठेवता यावा; तसेच असा शेतीमाल तारण ठेवून शेतकऱ्याला थेट कर्ज घेता यावे, अशी शेतीमाल तारण योजना कृषी पणन विभागाने सुरू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीस करण्यासाठी शेती उत्पन्न बाजार समितीची उदासीनता असल्याने बहुतांशी शेतकरी चांगल्या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

शेतीमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्याला सुविधा मिळावी तसेच शेतकऱ्याला आपला शेतीमाल बाजारपेठेत चांगला भाव आल्यानंतर विकता यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना नफा मिळवा, नुकसान टळावे या उद्देशाने पणन मंडळाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीमाल तारण कर्ज योजना आणली. यात शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वाखार महामंडळाला अथवा बाजार समितीच्या गोदामात ठेवायचा, त्यामालाच्या बाजार भावातील किंमतीनुसार ७५ टक्के रकमेचे कर्ज ६ टक्के व्याजदराने पणनतर्फे दिले जाते. असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेत शेतकऱ्याना शेतीमाला साठवण्याची गोदाम सुविधा बाजार समिती किंवा वखार महामंडळाच्या गोदामाची सोय करणे अपेक्षित आहे. त्यातून बाजार समितीलाही महसूल मिळतो. राज्य पणन मंडळाला शासनाकडून त्यासाठी ६० कोटींचा निधी आला आहे. त्यानुसार राज्यात मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ भागातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.(Kolhapur news)

द्राक्ष उत्पादकांचाच प्रतिसाद

पुणे विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांचा अपवाद वगळता इतर शेतीमालासाठी योजनेला नगन्य प्रतिसाद मिळाला आहे. अद्यापही पणन मार्फत ही योजना सुरू आहे. कोरोनाकाळात बाजारपेठेत भाव पडल्यास किंवा मागणी घटल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

महत्त्‍व पटवून दिले तर लाभ शक्य

योजना सुरू झाल्यापासून बाजार समितीनेही याबाबत शेतकऱ्यांत जागृती घडवण्यासाठी फारसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना योजना माहिती आहे, त्यांनीही लाभ घेतल्याचे दिसत नाही. अजूनही बाजार समितीने गोदामाची उपलब्ध करून दिले, शेतकऱ्यांना योजनेचे महत्त्‍व पटवून दिले तर त्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. मराठवाड्यात जवळपास 642 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. एक लाख ते दहा लाखापर्यंत शेतीमाल तारण कर्जही घेतल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

शेतकरी हिताची योजना म्हणून शेतीमाल तारण योजनेचे महत्त्‍व मोठे आहे, कोल्हापुरात योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. शेतीमाल गोदामात सुरक्षितरित्या साठवून ठेवला व बाजार पेठेत चांगला भाव आल्यानंतर तो विकला तर शेतकऱ्याच्या नफ्यात वाढ होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांना पणनकडून शेतीमाल तारणाचे कर्ज मिळेल व त्याचा विनियोग होईल.

-डॉ. सुभाष घुले, पुणे विभागीय व्यवस्थापक कृषी पणन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT