government Order to establish farmer honor and guide room In all Department of Agriculture 
कोल्हापूर

आघाडी सरकारचा मोठा निर्णय; आता वाढणार शेतकऱ्यांचे उत्पादन 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यातील कृषी विकासात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून शासनच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व कार्यालयात शेतकरी सन्मान व मागदर्शक कक्ष स्थापन करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या कक्षातून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. 

शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधून काम करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची समितीही स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीत कृषी विभागाशी संबंधित इतर खात्यांचे प्रतिनिधी, अग्रणी बॅंक, सहकार उपनिबंधक व किमान तीन प्रगतशील शेतकरी यांचाही समावेश करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या समितीच्या बैठकीस विशेष निमंत्रित म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांना उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होईल, त्यात हवामान, पीक परिस्थिती, उत्पादकता लक्षांक, विपणन, खते, बियाणे यांचा पुरवठा, पीक कर्जे, वीज जोडणी प्रकरणे आदि प्रश्‍नावर चर्चा करण्याचे आदेशात म्हटले आहे. 

शेतकरी सन्मान कक्षाच्या प्रमुखपदी अभ्यासू व सौजन्यशील कर्मचाऱ्यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे ज्या शाखेकडे काम आहे त्या शाखेतील संबंधितांशी संपर्क साधून आवश्‍यक ती माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. या कक्षाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. या कक्षासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शेतीविषयक मासिके, वर्तमानपत्र तसेच अंमलबजावणी सुरू असलेल्या योजनांची परिपत्रके वाचण्यासाठी ठेवावी लागणार आहेत. 

समितीची रचना अशी 
अध्यक्ष- तहसिलदार 
सदस्य सचिव - तालुका कृषी अधिकारी 
सदस्य - गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठाचे संशोधक, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य, रेशीम, खादी, ग्रामोद्याग विभागाचे प्रतिनिधी, महावितरण अभियंता, अग्रणी बॅंक प्रतिनिधी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बाजार समिती सचिव व तीन प्रगतशील शेतकरी त्यात एक महिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT