Comrade Govind Pansare esakal
कोल्हापूर

Govind Pansare Case : पानसरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; संशयित फरार विनय पवारसह पत्नीचे Photo साक्षीदाराने न्यायालयात ओळखले

आजच्या सुनावणीत पंच साक्षीदाराचा सरतपास आणि उलटतपास झाला.

सकाळ डिजिटल टीम

शर्मा हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात तपासासाठी गेले असता तेथे श्रद्धाने हे छायाचित्र हजर केले होते.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे (Govind Pansare murder case) यांच्या खुनातील संशयित फरार विनय पवार (Vinay Pawar) याचे गोव्यातील आश्रमात एकत्रित काढलेले छायाचित्र पत्नी श्रद्धाने पुणे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत (CID) छायाचित्र हजर केले होते. ते पंच साक्षीदाराने न्यायालयात (Courts) ओळखले, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली.

आजच्या सुनावणीत पंच साक्षीदाराचा सरतपास आणि उलटतपास झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या समोरही सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा तपास करीत होते. ते पुण्यातील सीआयडी कार्यालयात तपासात होते.

तेव्हा खुनातील तीन क्रमांकाचा संशयित फरार विनय पवार यांच्या पत्नीने आश्रमात काढलेले दोघांचे छायाचित्र हजर केले. ते छायाचित्र गोव्यातील आश्रमात २००८ मध्ये श्रद्धा आणि विनय पवार यांनी गुरुपौर्णिमेवेळी एकत्रित छायाचित्र काढले होते, असेही तिने सांगितले. पत्नी श्रद्धा उंब्रजमधील असून, विनय पवार हे पती असल्याचा पुरावा म्हणून तिने स्वतः हे छायाचित्र हजर केले. त्यावेळी तेथे पंच साक्षीदार हजर होता. त्याने तेच छायाचित्र आज न्यायालयात सरतपासात ओळखले.

शर्मा हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात तपासासाठी गेले असता तेथे श्रद्धाने हे छायाचित्र हजर केले होते. विनय पवार हा माझा पती आहे, हे तिने तेथे छायाचित्र हजर करून दाखविले. ते छायाचित्र पोलिसांनी २१ जून २०१६ ला जप्त केले. तेव्हा तेथे रासायनिक विश्‍लेषण शाखेतील अधिकारी पंचसाक्षीदार म्हणून होते. त्यांचाच आज न्यायालयात सरतपास आणि उलट तपास झाला.

दरम्यान, उलट तपासात संशयितांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर, अनिल रुईकर, एम. डी. लटके यांनी पंच साक्षीदारांचा पोलिसांचा वारंवार संपर्क असतो. त्यामुळे पोलिसांच्या सांगण्यावरून पचं साक्षीदार अशी साक्ष देत असल्याचा युक्तिवाद केला. तसेच प्रश्‍नांची सरबत्ती करून सरतपासातील मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आज (ता. २६) सुद्धा सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT