murder news in ichalkaranji esakal
कोल्हापूर

Kolhapur : शाळेतलं भांडण घरापर्यंत; पालकांमध्ये तुफान हाणामारी, हल्ल्यात एकाचा मृत्यू

मुलाला मारल्याचा राग आल्याने शेख याने आलासे यांच्या मुलास मारली कानफटीत

सकाळ डिजिटल टीम

शाळेतील शिक्षकांनी शेख यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला.

इचलकरंजी : एका शाळेतील (Ichalkaranji School) दोन लहान मुलांमध्ये वाद झाला. त्यातून दोन्ही मुलांच्या पालकांमध्ये आधी खडाजंगी आणि नंतर मारामारी झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सद्दाम सत्तार शेख (वय २७ , रा. स्वामी मळा) असे त्यांचे नाव आहे.

याप्रकरणी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) यांसह दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हा प्रकार कोले मळा येथील एका शाळेत घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, या घटनेमुळे संतापलेल्या शेख यांच्या नातेवाईकांनी गवंडी याच्या दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण होते. नातेवाईक, भागातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संबंधित शाळेत पहिलीच्या वर्गात टेम्पोचालक सद्दाम शेख, तसेच सलमा आलासे यांची मुले शिकण्यास आहेत. दुपारच्या सत्रात खेळता खेळता सलमा आलासे यांच्या मुलाचा शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणातून वाद झाला. यातून धक्काबुक्की झाली. आपल्या मुलाला मारल्याचा राग आल्याने शेख याने आलासे यांच्या मुलास कानफटीत मारली.

त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी शेख यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला. मुलाला मारहाण झाल्याचे समजताच सलमा यांनी भाऊ शब्बीर गवंडी यांना शाळेत बोलावून घेतले. यावेळी सलमा यांनी मुलाच्या मारहाणीचा जाब विचारला. यातून शेख आणि गवंडी यांच्यात वाद होत दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

त्यानंतर दोघांमध्ये झटापट आणि लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली. त्यात छातीवरही मार बसल्याने शेख जमिनीवर कोसळला. शाळेत शेख यांच्या नातेवाईकांसह भागातील नागरिकानी गर्दी केली. त्यांनी तातडीने शेखला दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र शेख यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्‍यांनी सांगितले.

शाळा सुटली अन् पालक भिडले

शाळेच्या वेळेत झालेला वाद शिक्षकांनी मिटवला होता; मात्र दोन्ही मुलांचे पालक शाळा सुटण्याच्यावेळी आले होते. यावेळी पुन्हा वादाला तोंड फुटले आणि पालकांच्यात वाद होऊन मारामारी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT