Journalist Organizations esakal
कोल्हापूर

'शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादारला तत्काळ अटक करा'; पत्रकार संघटनांकडून 'या' घटनेचा तीव्र निषेध

जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार (Raje Khan Jamadar) याला तत्काळ अटक करावी आणि त्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावे.

सकाळ डिजिटल टीम

मुरगूड (ता.कागल) येथील दैनिक ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कागल : मुरगूड येथील ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी (Journalist Assault Case) शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Group) जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार (Raje Khan Jamadar) याला तत्काळ अटक करावी आणि त्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व कागल तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आले.

याप्रसंगी भास्कर चंदनशिवे, सागर लोहार, तानाजी पाटील, कृष्णात माळी, नरेंद्र बोते, बा. ल. वंदूरकर, जहांगीर शेख, कृष्णात कोरे, कलंदर सनदी, विजय पाटील, विजय कुरणे, रवींद्र पाटील, नंदकुमार कांबळे, इम्रान मकानदार, फारुख मुल्ला, शिवाजी पाटील, बाबासाहेब चिकोडे, सम्राट सणगर, नामदेव गुरव, प्रशांत दळवी, सम्राट सणगर, जय चौगुले आदी उपस्थित होते.

बाचणीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निदर्शने

म्हाकवे : जमादार याची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी बाचणी (ता. कागल) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली. येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांच्या वतीने जमादार याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पत्रकार राजन वर्धन, ग्रा. पं. सदस्य सागर चौगले, सुभाष चौगले, आरपीआयचे तालुकाध्यक्ष तानाजी सोनाळकर, मार्तंड चौगले, संभाजी चौगले यांनी मनोगतातून जमादार याचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवाजी हातकर, भगवान पाटील, राजू चौगले, गणपती कांबळे, मिलिंद दीक्षित, सागर चौगले, एकनाथ चौगले, श्रावण चौगले उपस्थित होते.

आजऱ्यात निषेध

आजरा : मारहाणीच्या घटनेचा आजरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार व सहायक पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी बशीर मुल्ला, रणजित कालेकर, सदाशिव मोरे, ज्योतिप्रसाद सावंत, सुनील पाटील, कृष्णा सावंत, संभाजी जाधव, विकास सुतार, सुभाष पाटील, अमित गुरव, श्रीकांत देसाई, आदी उपस्थित होते.

वारणा परिसर पत्रकारांचे निवेदन

वारणानगर : मारहाण केलेल्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी वारणा परिसरातील पत्रकारांच्या वतीने कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, संजय पाटील, आनंदा वायदंडे, प्रकाश मोहरेकर, राजकुमार जाधव, बाबासो जाधव, बाबा माने, सनी काळे, कृष्णात हिरवे, अजित लोकरे उपस्थित होते.

तिराळे यांना संरक्षण देण्याची मागणी

तिराळे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध कागल तालुका सकल मातंग समाजाच्यावतीने करण्यात आला. शासनाने त्यांना व कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी कागल पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर कागल तालुका मातंग समाज अध्यक्ष प्रकाश मारुती तिराळे, कागल तालुका दलित महासंघ अध्यक्ष डॉ. अनिल भोसले, दीपाली आवळे, मोहन आवळे, मोनिका पद्माकर पाटील, अॅड. अशोक घुले, आनंदा हेगडे, सचिन कांबळे, विनोद माने, कसबा दिपक हेगडे, दीपक कांबळे, दिनकर आवळे, आदींच्या सह्या आहेत.

मुरगूडमधील मारहाणीचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : मुरगूड (ता.कागल) येथील दैनिक ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तिराळे यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख राजेखान जमादार याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Latest Marathi News Live Update : दोन पोलिस अधिकाऱ्यांना केले सेवेतून बडतर्फ

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT