Trimboli Yatra Rajwada Police Station esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : यात्रेत बकऱ्याची मुंडी घेण्यावरुन जोरदार राडा; हॉकी स्टेडियम परिसरात सईदवर सपासप वार

हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे त्र्यंबोली यात्रेनिमित्त मटणाचे वाटे व मुंडी वितरण सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

सईद नायकवडी- शानेदिवाण हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम येथे मटणाचा वाटा नेण्यासाठी आला होता.

Kolhapur News : त्र्यंबोली यात्रेतील (Trimboli Yatra) मटणाच्या (Mutton) वाट्यातील मुंडी घेण्यावरुन झालेल्या वादावादीतून सईद अन्वर सलीम नायकवडी- शानेदिवाण (वय २९, रा. म्हाडा कॉलनी, हॉकी स्टेडियम) याच्यावर चाकूहल्ला झाला.

काल सकाळी हॉकी स्टेडियम (Hockey Stadium) परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सईदला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जुना राजवाडा पोलिसांनी निहाल हजारे (पूर्ण नाव समजले नाही), गोट्या परब (रा. बालाजी पार्क) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे त्र्यंबोली यात्रेनिमित्त मटणाचे वाटे व मुंडी वितरण सुरू होते. सईद नायकवडी- शानेदिवाण हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम येथे मटणाचा वाटा नेण्यासाठी आला होता.

त्यावेळी त्याला एका मित्राने फोनवरून ओंकार शिंदे व गोट्या परब यांच्यात मुंडीच्या वाट्यावरून जोरदार वादावादी सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे सईद हा तत्काळ तेथे गेला. त्याने मध्यस्थी करुन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

परंतु गोट्या परब ऐकायला तयार नव्हता. तो सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निहाल हजारे व अन्य १० ते १२ जणांच्यासोबत पुन्हा म्हाडा कॉलनी येथील सईदच्या घराजवळ गेला. सईद व त्याचा मित्र राहुल लोहार हे पुन्हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करताना गोट्या व निहाल हे लोहारच्या अंगावर गेले. त्याला सोडवत असतानाच या दोघांनीही सईदवर चाकूहल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT