कोल्हापूर sakal
कोल्हापूर

कोल्हापूर - अंबाबाई परिसरात महिला-पुरुष भाविकांत हाणामारी

झटापट करणारे भाविक जालना येथून अंबाबाई दर्शनासाठी आले होते.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - येथील अंबाबाई मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ई-पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे राहण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. महिला आणि पुरुष भाविकांमध्ये झटापट झाली आहे. हा वाद इतका टोकाला गेला की भाविकांनी एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झटापट करणारे भाविक जालना येथून अंबाबाई दर्शनासाठी आले होते. अचानक ई-पाससाठी असलेल्या रांगेत उभे राहण्यावरून भाविकांमध्ये बाचाबाची सुरु झाली. काही क्षणात पुरुष आणि महिला भाविकांमध्ये वादला सुरुवात झाली. त्यांची हा वाद एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारण्यापर्यंत गेला. दरम्यान काही काळासाठी व्यवस्थापन समितीसह अनेकांची तारांबळ उडाली. काही काळासाठी मंदिर परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपाने भाविकांचा वाद नियंत्रणात आला.

आजपासून तासाला ८०० भाविकांना दर्शन

दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन आता तासाला आठशे भाविकांना घेता येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तासाला चारशे भाविकांनाच ई-पासच्या माध्यमातून दर्शन घेता येत होते. आता पुन्हा ही संख्या दुप्पट करण्यात आली आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. तासाला साधारणपणे दीड हजार भाविकांना ई-पासच्या माध्यमातून दर्शनाची सुविधा या दोन्ही मंदिरात होती. मात्र, जमावबंदी व संचारबंदीच्या निर्णयानंतर मंदिरातील दर्शन वेळही सकाळी सहा ते रात्री ९ अशी केली आणि ई-पास बुकिंगही चारशेवर आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

Eknath Shinde Aditya Thackeray : "कोण होतास तू, काय झालास तू... अरे वेड्या, असा वाया गेलास तू" एकनाथ शिंदेची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

SCROLL FOR NEXT