kolhapur news
kolhapur news esakal
कोल्हापूर

Kolhapur : गृह प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घर, बंगला किंवा फ्लॅट घ्यायचं स्वप्न तुम्ही पाहताय, अार्थिक तजवीज करत आहात, थोडे पैसे कमी पडत असतील तरीही हरकत नाही, तुम्ही नक्की घर घेऊ शकता. तत्काळ बुकिंगवर सवलत, कर्ज योजनांचा लाभ घेता येईल. तुम्ही फक्त साईट पाहा, मनपसंत निवासस्थान पसंत करा.अशा घराबरोबर तुमच्या नित्य जगण्याला बळ देणारी प्रसन्नता आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास पूरक ठरणाऱ्या सुविधांचाही लाभ घ्या.म्हणजे घरांचे स्वप्न साकारताना जगण्याचे प्रश्नही अलगत सुटतील. असा दुहेरी लाभ देणाऱ्या गृहप्रकल्पांची माहिती सकाळ वास्तू प्रॉपर्टी प्रदर्शनातून असंख्य ग्राहकांनी जाणून घेतली. घर घेण्याचे स्वप्न साकारण्याचे जणू निश्चित केले.

हॉटेल पॅव्हेलीयन येथे आयोजित केलेल्या सकाळ-वास्तू प्रॉपर्टी प्रदर्शनाला आज दुसऱ्या दिवशीही ग्राहकांचा उंदड प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील नामांकित बिल्डर्स डेव्हलपर्सकडून सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची माहिती प्रदर्शनात पाहायला मिळाली. अनेक नोकरदार, व्यावसायिकांना शहरात किंवा शहराजवळच्या भागात फ्लॅट घेता येईल, अशा अनेक साईटचे लोकेशन, आराखडा येथील विविध स्टॉल्सवर आहेत. यात अनेक ग्राहकांनी ताराबाई पार्क, गिरगाव, फुलेवाडी, कदमवाडी, कसबा बावडा रोड, नागाळा पार्क यासह परिसरात असलेल्या वन बीएचके, टू बीएचके फ्लॅटची माहिती जाणून घेतली.

बहुतेक साईटवर फ्लॅटबरोबर अन्य सुविधाही दिल्या आहेत. ग्राहकांचा फ्लॅटच्या रचनेसोबत गृहप्रकल्पातील पुरक सुविधा कशा आहेत, याची माहिती घेण्यावर अधिक भर होता. १५ लाखांपासून ते ५ कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट त्याअंतर्गत सुविधा प्रशस्त जागा व सोयीचे लोकेशन, तसेच इमारतीची भक्कम बांधणी, रस्ते, जवळची महत्त्वाची ठिकाणे त्यांचे किमी अंतर याचे डिझाइनिंग दाखविले. तसेच फ्लॅट घेण्यासाठी तत्काळ नोंदणीवर भक्कम सवलत, कर्ज योजनांचा लाभ, तसेच कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन येथे मिळत आहे. त्याचाही लाभ ग्राहकांनी घेतला.

विविध प्रकल्पांची माहिती येथील स्टॉल्सवर मिळाली. गरजेनुसार राहण्यासाठी फ्लॅट घेण्याचे निश्चित केले. तांत्रिक बाबी समजून घेता आल्या. त्यामुळे प्रत्यक्ष साईट बघून घर घेण्याचे निश्चित करणे सोपे झाले आहे.

-अभय माने, नोकरदार

फ्लॅट घ्यायचे ठरवले. त्यासाठी आम्ही शहराजवळच लोकेशन आम्हाला हवे आहे. घराच्या शोधात बाहेर फिरताना एक-दोन साईटची माहिती एकावेळी जाणून घेता येते. या प्रदर्शनात आल्यामुळे एका वेळी अनेक साईटवरील घराचे लोकेशन, तसेच त्या गृह प्रकल्पात असलेल्या सुविधा जाणून घेता आल्या. त्यामुळे घर घेण्यासाठी नव्या पर्यायांची माहिती मिळाली, याचे समाधान आहे.

-सी. के. गायकवाड, निवृत्त प्राध्यापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT