Leader Of The Nationalist Aanadrav Patil Murder In Palus Sangli Marathi News 
कोल्हापूर

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या भावाचा खून....सविस्तर वाचा.....

सकाळ वृत्तसेवा

भिलवडी (सांगली)  : खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव धोंडिराम पाटील (वय ५४) यांचा भरदिवसा धारदार कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला. सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास शेतातून घराकडे दुचाकीने जात असताना हा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगलीतील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आनंदराव यांचे कनिष्ठ बंधू गजानन पाटील (अपर जिल्हाधिकारी) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस कसून तपास करीत आहेत. दोन संशयित हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपसात पुढे आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

कोयत्याने झाला हल्ला 
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आनंदराव यांची खटाव-माळवाडी रस्त्यावर द्राक्षबाग आहे. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे द्राक्षबागेत गेले होते. धाकटा मुलगा विश्‍वजितही शेतात आला होता. तेथून दुपारी ते दुचाकीने (एमएच १० एम ७०३०) घरी परतत होते. गावानजीकच्या गजानन अण्णा पाटील यांच्या शेतानजीक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला. डोक्‍यात वर्मी घाव बसल्याने ते रस्त्याकडेच्या शेतात कोसळले. त्यांची दुचाकी रस्त्याकडेला पडली होती.

रक्ताच्या थारोळ्यात

घाव जोरदार बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही वेळातच त्यांचा मुलगा विश्‍वजित घरी जात असताना वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकी, रक्ताने माखलेला धारदार कोयता, दोन मोबाईल, चष्मा आढळला. घटनास्थळी बराच काळ लोकांची गर्दी होती. गावात मात्र शांतता होती. सिव्हील हॉस्पिटल परिसरात मात्र अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती.

आर. आर. पाटलांचे कट्टर कार्यकर्ते
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे आनंदराव पाटील हे कट्टर कार्यकर्ते होते. ते सन २००४ ते २००९ दरम्यान खटावला सरपंच होते. सांगली जिल्हा मजूर फेडरेशन, तासगावच्या सूतगिरणीत सध्या संचालक होते. विकास सोसायटी व पाणीपुरवठा संस्था त्यांच्या ताब्यात होती. गावात त्यांचा स्वतंत्र राजकीय गट होता. पाटील यांना दोन मुले व एक मुलगी आहे. थोरला अभिजित पुणे येथे उद्योग क्षेत्रात, तर धाकटा विश्‍वजित कृषी पदवीधर आहे. 

‘इन कॅमेरा’ शवचिकित्सा करा
घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी होती. मोठा बंदोबस्तही तैनात केला होता. मृतदेहाची उत्तरीय तपासणी ‘इन कॅमेरा’ व्हावी, अशी मागणी नातेवाइकांनी केल्याने सायंकाळी उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT