कोल्हापूर esakal
कोल्हापूर

'मतांचा 270 आकडा गाठणार'; सतेज पाटील यांचा दावा

महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.

कोल्हापूर - आजच्या घडीला जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडील संख्याबळ हे अडीशेच्या खाली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढून 270 पर्यंत जाईल असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इतर घटक पक्ष किंवा अपक्ष असतील या सर्वांचा निश्चितच मला पाठिंबा असणार आहे, त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मागीलवेळी झालेल्या निवडणूकीविषयी विचारले असता ते म्हणाले, गेली दोन वर्षे सातत्याने आम्ही सत्ताधारी म्हणून लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील नगरपालिका किंवा जिल्हा परिषद येथील सदस्यांचा विश्वास आम्ही संपादित केला आहे. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आजच्या घडीला महाविकास आघाडीचा आकडा अडीशेच्या खाली नाही. येत्या दोन दिवसात हा आकडा आणखी वाढून 270 पर्यंत जाईल असा मला विश्वास आहे. कागदावर पाहिले तर आम्ही सर्व महाविकास आघाडी एकत्र आहोत त्यामुळे विजय निश्चितपणे आमचाच होईल, असेही ते म्हणाले. यावेळी उच्च शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पी. एन. पाटील हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT