पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील Sakal
कोल्हापूर

आघाडीकडून पैलवान पृथ्वीराज पाटलांना पाच लाखाचे बक्षीस जाहीर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: महाराष्ट्र कुस्ती या मानाच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचे पैलवान पृथ्वीराज पाटील (Prithwiraj Patil) यांनी २५ वर्षानंतर मानाचा पुरस्कार कोल्हापूरला (Kolhapur) मिळवून दिला याबद्दल सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान कोल्हापूर महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज पाटील यांना पाच लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif), कोल्हापूर शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (Arun Dudhwadkar) यांनी बक्षिसाची घोषणा केली.याचबरोबर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे अभिनंदन केले. पृथ्वीराज यांचा सत्कार भाजप करेल असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर पृथ्वीराज पाटील यांना भाजप पाच लाख रुपये बक्षीस देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कोल्हापूरची कुस्ती जगविख्यात आहे. देशभरातून मल्ल याठिकाणी येत असतात. कोल्हापूरची शान वाढावी, जगाच्या नकाशात कोल्हापूरचे नावं नेहमीच वरच्या पट्ट्यात राहावे यासाठी सर्वंच खेळाडू मनापासून तयारी करत असतात. मात्र तब्बल २५ वर्षानंतर पुरस्कार मिळवून देऊन कोल्हापूरची पृथ्वीराजने शान वाढवली आहे. कोल्हापूरच्या या खेळाडूंना मदत मिळावी यासाठी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. राज्याच्या राजकारणात भलेही आरोप-प्रत्यारोप होत असले तरी आज भाजप आणि महाविकास आघाडीने खेळासाठी मदत करून नक्कीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT