Maratha Reservation esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : ..अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावले जातील; मराठा समाजाचा राजकीय नेत्यांना स्पष्ट इशारा

मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असून, मराठा आंदोलकांचा राज्यात वणवा पसरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रकांत पाटील यांची शासनाने मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. या पदाची जबाबदारी मात्र शासन त्यांना देत नाही.

कोल्हापूर : ‘सर्वपक्षीय नेत्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाही, असे ठरवून सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) व्यासपीठावर यावे. अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावले जातील’, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पदाची कोणतीच जबाबदारी शासन देणार नसेल तर त्यांनी समितीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असून, मराठा आंदोलकांचा राज्यात वणवा पसरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साठ टक्के गावांत नेत्यांच्या बंदीचे फलक लागले आहेत. आमदार, खासदार यांच्याबद्दल आमची मते कलुषित नाहीत. मात्र, पुन्हा फसले जाणार नाही, त्यासाठी समाजाने गावबंदीचा निर्णय घेतला आहे. आमदार व खासदार यांच्यात सुसंवाद साधून त्यांनी एकत्र यावे. जरांगे-पाटील यांची तब्येत चिंताजनक बनली असताना, श्री. पाटील त्यांना भेटायला अद्याप गेलेले नाहीत. ते मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पद सोपवले असले तरी त्यांना त्या पदाच्या कामापासून रोखले जात आहे.’

बाबा इंदूलकर म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांची शासनाने मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. या पदाची जबाबदारी मात्र शासन त्यांना देत नाही. गिरीश महाजन कसे काय चर्चा करायला जातात. त्यामुळे पाटील यांनी गैरविश्वास न ठेवता पदाचा राजीनामा द्यावा. ’

दिलीप देसाई म्हणाले, ‘चाळीस दिवस मुदत देऊनही शासनाला आरक्षण देता आले नाही. मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडून विशेष अधिवेशन बोलवावे. खासदारांनी राज्यसभेत जाऊन विशेष अधिवेशनाची मागणी करावी. अन्यथा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी.’

बाबा पार्टे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी सत्तेवर राहू नये.’ विजय देवणे यांनी मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असताना प्रशासनाला त्याची कल्पना कशी काय नाही, अशी विचारणा केली. अनिल घाटगे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना मोदी जाहीर सभेत एक शब्दही बोलले नसल्याबद्दल निषेध केला.

जरांगेंना भेटायला शासनाला वेळ नाही

‘जरांगे यांच्या आचारसंहितेनुसार आंदोलन केले जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा निकाल लागेपर्यंत नेत्यांनी कोणतीही शासकीय बैठक घेऊ नये. नव्या योजना जाहीर करू नयेत. जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असतानाही त्यांना भेटायला जायला शासनाला वेळ का नाही, असा प्रश्‍न इंदूलकर यांनी उपस्थित केला. तसेच दोन दिवसांत जरांगे यांना भेटायला आंदोलक अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचे सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका....

सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असा मेसेज फिरत आहे. ही अफवा असून कोल्हापूर बंदबाबत सकल मराठा समाजाकडून दसरा चौकातून‌ जोपर्यंत बंदबाबत निर्णय घेतला जात नाही, जरांगे -पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही संदेश अथवा मेसेज येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र बंद अथवा कोल्हापूर बंद होणार नाही. दसरा चौक येथे साखळी उपोषण आंदोलन शांततेत सुरू राहील, अशी माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT