Nitesh Rane esakal
कोल्हापूर

नितेश राणेंना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरात आणणार

आमदार नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आल्याने त्यांना सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज आमदार नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सीपीआरमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथून ते कोल्हापूरसाठी रवाना झाले असून थोड्यात कालावधीत ते कोल्हापुरातील (Kolhapur) सीपीआर येथे पोहचणार आहेत.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीत (Court) असलेल्या भाजपाचे (BJP) आमदार नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून नेण्यात आले आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली (Kankavali) न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर राणे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने पाच फेब्रुवारीला त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज अचानक त्यांना कोल्हापूर (CPR) येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळापूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे पथक तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, नेमका कोणता आजार आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी व्हीसीमध्ये असल्याचे सांगत भेट देण्यास नाकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT