Kolhapur Bandh News esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : छ. शिवाजी महाराजांवर वादग्रस्त स्टेटस्; कोल्हापुरात शुकशुकाट, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

Kolhapur Bandh News: समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला.

सकाळ डिजिटल टीम

हा बंद मागे घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं हिंदुत्तवादी संघटनांना केलं आहे. परंतु, ते बंदवर ठाम राहिले आहेत.

Kolhapur Bandh : समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला, त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज (बुधवार, ता. 7) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोल्हापूर शहरात एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळं काल शहरात तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस (Laxmipuri Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.

पोलिसांकडून कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार, सीपीआर चौकासह परिसर, दसरा चौकात प्रार्थनास्थळांवरही दगडफेक केली.

कोल्हापुरात काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस् ठेवलं. त्यामुळं तणाव निर्णाण झाला त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी, कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झालीये.

दरम्यान, आज (बुधवार) हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास प्रशासनानं बंदी केली आहे. जमाव जमवणं, मोर्चे काढणं, सभा घेणं याला प्रशासनानं बंदी घातली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भगवानराव कांबळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत.

हा बंद मागे घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं हिंदुत्तवादी संघटनांना केलं आहे. परंतु, ते बंदवर ठाम राहिले आहेत. दरम्यान, आज सकाळपासून शहरातील व्हिनस काॅर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे.

बस, रिक्षा सुरु आहेत. आज दहा वाजता शिवाजी चौक परिसरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार आहेत. त्यानंतर बंदची हाक देण्यात येणार आहे, तसंच प्रशासनाबरोबर चर्चा देखील होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT