संग्रहित फोटो esakal
कोल्हापूर

Kolhapur : हातकणंगलेत राडा; ताबूत विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीमार, जमावाच्या चेंगराचेंगरीत महिलांसह लहान मुलं जखमी

सैरभैर झालेल्या जमावाच्या चेंगराचेंगरीत अनेक महिला, वयोवृद्ध व लहान मुले जखमी

सकाळ डिजिटल टीम

मोहरमच्या पंजा भेटीसाठी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाचा वापर करणे, नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हातकणंगले : मोहरम (Muharram) निमित्ताने निघालेल्या ताबूत विसर्जन मिरवणुकीत दोन युवकांच्यात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी हातकणंगले पोलिसांनी (Hatkanangale Police) अचानक लाठीमार सुरू केल्याने मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला.

सैरभैर झालेल्या जमावाच्या चेंगराचेंगरीत अनेक महिला, वयोवृद्ध व लहान मुले जखमी झाली, तर पोलिसांच्या लाठीमारात काही कार्यकर्ते जखमी झाले.

दरम्यान, लाठीमाराचे आदेश नसतानाही काही पोलिस कर्मचाऱ्यां‍नी जाणीवपूर्वक लाठीमार केल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्या‍वर कारवाई झाल्याशिवाय ताबूत विसर्जन न करण्याचा निर्णय घेत बाबूजमाल तालमीच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात सवाऱ्यांसह ठिय्या मारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

अखेरीस या घटनेची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिल्यानंतर जमाव शांत होऊन ताबुतांचे रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. हातकणंगलेतील मोहरममध्ये दोन तालमींमध्ये नेहमीच वर्चस्व वादाची लढाई सुरू असते. मात्र, आजवरच्या इतिहासात कधीच लाठीमारापर्यंत प्रसंग घडला नाही.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तालमींच्या काही कार्यकर्त्याकडून व्हॉटसॲप स्टेटस्‌ ठेवल्यावरून वाद धुमसत होता. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही तालमींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. काल सायंकाळी येथील दर्ग्यातून ताबूत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी दोन युवकांच्यात वाद सुरू झाला. हे समजताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

काही पोलिस कर्मचाऱ्यां‍नी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता थेट लाठीमार सुरू केला. यामुळे जमाव सैरभैर झाला. यात अनेकजण जखमी झाले. यामुळे बाबूजमाल तालमीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी लाठीमार का केला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झाल्याशिवाय विसर्जन न करण्याचा निर्णय घेत सवाऱ्यासह ठिय्या मारला.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी साळुंके, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले आणि सहकाऱ्यां‍नी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेरीस तालमीचे पदाधिकारी व पोलिस यांच्यात चर्चा होऊन त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

नियमांचे उल्लंघन केल्याने मोहरम मिरवणुकीत १५ जणांवर गुन्हे

कोल्हापूर : मोहरमच्या पंजा भेटीसाठी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाचा वापर करणे, नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ध्वनिक्षेपकाचे मालक, ट्रॅक्टरचालक यांचा समावेश आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवलकशा भक्त तरुण मंडळांचे अध्यक्ष अजीम शब्बीर पेंढारी (वय २५, रा. साळी गल्ली, सोमवार पेठ), उपाध्यक्ष शाहीद कय्युम मोमीन (वय २२, साळी गल्ली, सोमवार पेठ), साउंड सिस्टीममालक अभिजित राजाराम मिठारी (वय ४०, रुईकर कॉलनी), स्ट्रक्चर व विद्युत रोषणाई मालक शुभम शिवाजी भोसले (वय २७, रा. फुलेवाडी), पंजा स्पार्टन ग्रुपचे आफताब बाळासाहेब नायकवडी (रा. बी. डी. कॉलनी), अनिस महंम्मद शेख (वय २०, रा. बी. डी. कॉलनी).

तसेच साउंड सिस्टीममालक अनिकेत मानसिंग सावंत (वय ३०, रा. राजोपाध्येनगर), स्ट्रक्चर, विद्युत रोषणाईमालक शिवतेज सर्जेराव वांद्रे (वय २५, रा. कोतोली ता. पन्हाळा), निखिल तुकाराम गजगेश्वर (वय ३०, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), साहिल पुंडलिक भाट (वय २२, रा. एसटी कॉलनी, राजारामपुरी).

साउंड सिस्टीममालक अविनाश दत्तात्रय भोसले (वय ३५, रा. टोप, ता. हातकणंगले), विद्युत रोषणाई मालक तुषार तुकाराम पाटील (वय २६, रा. राजारामपुरी), राजू कमरुद्दीन शेख (वय ३७, रा. विचारेमाळ, शाहू कॉलेज), साउंड सिस्टीम राजू धोंडिराम पाटील (वय ३९, रा. कागल), स्ट्रक्चरमालक महेश विरुपाक्ष शशी (वय २८, रा. देवकर पाणंद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT