pre monsoon rain coming in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आज सकाळपासून अंगाची लाही लाही होत असताना अचनकच ढगांच्या कडकडाटासह जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरील लावली. त्यामुळे गेल्या दोन दिवसात जाणवणाऱ्या कडक उखाड्यानंतर सुरु झालेल्या पावसामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. तसेच कृषी विभागाने दिलेल्या सूचनेनूसार मे महिन्याच्या तिसऱ्या आवठवड्यात ज्यांनी-ज्यांनी भाताची पेरणी केली, त्यांच्यासाठी हा पाऊस खूपच पोषक ठरणार आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


केरळमध्ये 1 जून आणि सिंधूदुर्गसह इतर जिल्ह्यात 9 ते 10 जूनपर्यंत मॉन्सून सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजच त्याचा प्रत्यय आला आहे. ढगांच्या कडकडाटासह जोरदार पडत असलेल्या पावसामुळे काही मिनिटात मान्सून सक्रीय झाल्याचे वातावरण दिसू लागले आहे. हा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात सर्व दूर सुरू झाला आहे. कोल्हापूर शहरात दुपारी 2 : 35 मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली. पंधरात ते वीस मिनिटातच शहरातील गटारी आणि रस्ते तंडुंब भरुन वाहू लागले आहेत. 

दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्हावासियांना चांगलाच दिलासा दिला. प्रचंड उष्म्यामुळे कासावीस झालेल्या नागरिकांना पावसाचा सुखद गारवा मिळाला. शहर व परिसरात तसेच जिल्ह्याच्या पूर्वभागात चांगला पाऊस झाला.

आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासूनच हवेतील उष्मा वाढला होता. त्यामुळे दिवसभरात पाऊस येणार याचा अंदाज नागरिकांनी बांधला होता. दुपारी आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरभर पाणी साचले.


ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. पाऊस पडणार याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. पेरणीच्या वेळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या आठवडय़ात चांगला पाऊस होईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT