Radhanagari Bhudargad Assembly Politics esakal
कोल्हापूर

Prakash Abitkar : मेहुण्या-पाहुण्यांतील वाद पुन्हा उफाळला; आमदार आबिटकरांविरोधात कोण? राधानगरीत जोरदार हालचाली

आमदार आबिटकर आणि के. पी. पाटील या दोघांचेही पक्ष सध्या सत्तेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बिद्रीच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. यांचे डिपॉझिट जप्त करण्याचे केलेले आवाहन अजूनही ए. वाय. पाटील यांना सलत आहे.

राशिवडे बुद्रुक : राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघामध्ये (Radhanagari-Bhudargad Assembly Constituency) आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मेहुण्या-पाहुण्यांच्या वादात नेमके काय होणार, हेदेखील सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये (Congress) कोण जाणार, कोण बंड करणार? यावरच विधानसभा लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मंगळवारी (ता. ५) ए. वाय. पाटील यांचा मेळावा, तर के. पी. पाटील यांचा राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १०) होत आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होताच झपाट्याने विकासकामे करून आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी जनमानसांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक गाव आणि वाड्यावस्तीवर विकास नेऊन आपला स्वतःचा ठसा मतदारांवर उमटविण्यात ते यशस्वी झाले आहेत. विकासकामे करताना दुसरीकडे विरोधकांची मोट फोडण्यातही त्यांच्या हालचाली वेळोवेळी दिसतात.

नुकत्याच झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत (Bidri Factory Election) राजकीय विरोधक असलेल्या के. पी. पाटील यांना शह देण्यासाठी त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांना आपल्या तंबूत घेतले. त्यामुळे सहाजिकच त्यांना बळ मिळाले असले तरी राजकारणात वस्ताद असलेल्या केपींनीही आपला दुसरा डाव टाकला. ए. वाय. यांचेच विश्वासू कार्यकर्ते असलेल्या लोकांना फोडून आपल्या पंगतीला बसविले. यामुळे पुन्हा मेहुण्या -पाहुण्यांतील वाद उफाळून आला आहे.

दुसरीकडे बिद्रीच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. यांचे डिपॉझिट जप्त करण्याचे केलेले आवाहन अजूनही ए. वाय. पाटील यांना सलत आहे. यातूनच आपली शक्ती दाखविण्यासाठी आता ए. वाय. धडपडू लागले आहेत. नुकताच त्यांनी सोळांकुर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मुश्रीफ आणि के. पी. यांच्यावर थेट निशाणा साधला. मंगळवारी त्यांचा सोळांकुर येथे मेळावा होत आहे, तर राधानगरी तालुक्यात आपली ताकद वाढली असल्याचे दाखवण्यासाठी के. पी. पाटील हे नरतवडे येथे मेळावा घेत आहेत.

खिंड रोखण्यासाठी ए. वाय. यांच्या हालचाली?

आमदार आबिटकर आणि के. पी. पाटील या दोघांचेही पक्ष सध्या सत्तेत आहेत. विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी एक तर त्यांना तंबू सोडून बाहेर यावे लागेल. अर्थात, त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल. ही खिंड रोखण्यासाठी ए. वाय. पाटील यांच्याही काँग्रेसमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT