कोल्हापूर

शिल्लक दुधाचा प्रश्‍न गंभीर : मंत्री सुनील केदार

निवास चौगले

कोल्हापूर : कोरोनाच्या लाटेतही (corona effects) राज्यात दूध विक्रीत मोठी घट झाली असून शिल्लक दुधाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. राज्यात सरासरी रोज ५० लाख लिटर दूध शिल्लक रहात आहे, याचा फटका दूध संघांना बसत आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविकास आघाडी (mahavikas aghadi sarkar) सरकार शिल्लक दुधाच्या भुकटीसाठी लवकरच अनुदान देण्यचा विचार करत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी दिली. केदार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांचे स्वागत आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेळी माजी उपमहपौर संजय मोहिते, अर्जुन माने, तौफिक मुल्लाणी, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने आदि उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना केदार म्हणाले, ‘गेल्यावर्षी राज्य शासनाने दूध भुकटीसाठी १२७ कोटी रूपये अनुदान दिले होते. यंदाही शिल्लक दुधावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर तर पश्‍चिम महाराष्ट्रात (paschim maharashtra) चार लाख लिटरहून अधिक दूध शिल्लक रहात आहे. ‘गोकुळ’ (gokul kolhapur) दूध संघाकडे लॉकडाऊन काळात (lockdown) सरासरी १ लाख ७० हजार लिटर दूध शिल्लक रहात आहे. शिल्लक दुधामुळे राज्यातील सर्वच दूध संघांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. शासनाने सहकारी व खासगी दूध संघाकडे अतिरिक्त दूध पाठवावे, प्रक्रिया करणाऱ्या संघाना प्रती किलोमागे ३० रूपये तर दूध पाठवणाऱ्या संघांना वाहतूक खर्चापोटी प्रती लिटर तीन रूपये द्यावेत अशी मागणी आहे.’

गायीच्या दुधाला सरासरी २५ रूपये लिटर दराने खरेदी करण्याची मागणी होत आहे, यावरही तोडगा काढणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले. राज्यात पशुसंवर्धन विभागाकडून गाय , म्हैस खरेदीची योजना राबवली जाते. मात्र या योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नाही. तो तात्काळ करावा, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी नगरसेवक मोहन सालपे, आश्‍पाक आजरेकर आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT